आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणमहाराष्ट्रराजकीय

चांडोली बु.(ता. आंबेगाव) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची विद्यार्थिनी कू.अनुष्का रमेश मावकर ची नवोदय विद्यालय पिंपळे जगताप येथे पुढील शिक्षणासाठी निवड!!

चांडोली बु.(ता. आंबेगाव) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची विद्यार्थिनी कू.अनुष्का रमेश मावकर ची नवोदय विद्यालय पिंपळे जगताप येथे पुढील शिक्षणासाठी निवड!!

आंबेगाव तालुक्यात प्रगतशील गाव म्हणून ओळख असणाऱ्या चांडोली बू. च्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चांडोली बू. ची विद्यार्थिनी कू. अनुष्का रमेश मावकार ची पुढील शिक्षणासाठी नवोदय विद्यालय पिंपळे जगताप येथे पुढील शिक्षणासाठी निवड झाली आहे.

सर्व सामान्य शेतकरी कुटुंबातील अत्यंत हुशार, नेतृत्व, वक्तृत्व गुण संपन्न, होतकरू मुलीची नवोदय विद्यालय पिंपळे जगताप येथे निवड झाल्याने सर्वच स्तरावरून तीचे कौतुक व अभिनंदन केले जात आहे.
अनुष्काला वर्ग शिक्षिका सौ. दीपा दत्ता गोरडे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

मुख्याध्यापिका सौ दीपाली अजाब, सर्व शिक्षक वृंद,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. शशिकांत थोरात, केन्द्र प्रमुख श्री मनोहर सांगळे साहेब, विस्तार अधिकारी श्री साहेबराव शिंदे, गट शिक्षणाधिकारी सौ. सविता माळी मॅडम तसेच समस्थ ग्रामस्थ चांडोली बु. यांनी तीचे अभिनंदन केले आहे.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.