आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीसामाजिक

धामणी (ता.आंबेगाव) येथे संपन्न झाला स्पर्धा परिक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार!!

धामणी (ता.आंबेगाव) येथे संपन्न झाला स्पर्धा परिक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार!!

समस्त ग्रामस्थ धामणी,पहाडदरा, शिरदाळे,ज्ञानेश्वरवस्ती, श्री शिवाजी विद्यालय धामणी यांच्या माध्यमातून आंबेगाव तालुक्यातील मंत्रालयीन सहाय्यकपदी (एम.पी.एस.सी)निवड झालेल्या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ पुणे गृहनिर्माण प्रकल्पाचे(म्हाडा) अध्यक्ष मा.खा.शिवाजीदादा आढळराव पाटील व एन.सी.आर.डी.संस्थेच्या संचालिका पुर्वाताई वळसे पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

पुणे गृहनिर्माण प्रकल्पाचे अध्यक्ष मा. खा.शिवाजीदादा आढळराव पाटील यांनी बोलताना सांगितले की,स्पर्धा परिक्षेकडे विद्यार्थ्यांचा कल वाढलेला आहे.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी जास्तीच जास्त यश मिळविले आहे हे पाहुन अभिमान वाटतो. हे सर्व विद्यार्थी हे खरे आयडॉल आहेत.

एन.सी.आर.डी.च्या संचालिका पुर्वाताई वळसे पाटील यांनी बोलताना सांगितले की,सर्व यशस्वी विद्यार्थी हे शेतकरी कुटुंबातील आहेत.ग्रामीण भागात दर्जेदार शिक्षण दिले जाते. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांमध्ये ध्येय व चिकाटी हे गुण आढळतात त्यामुळे ते यशस्वी होतात.

या प्रसंगी पंचायत समिती सदस्य रवींद्र करंजखेले,सरपंच रेश्मा बोऱ्हाडे,कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. अशोकराव पगारिया,विद्यालयाचे प्राचार्य शेंडकर सर,एम.पी.एस.सी. उत्तीर्ण तेजस डोके,अमोल लंके यांनी मनोगत व्यक्त केले.एन.एम.एम.एस परीक्षेमध्ये तालुक्यात प्रथम क्रमांक आलेल्या समृद्धी राजेंद्र गवंडी व उत्तीर्ण १८ विद्यार्थ्यांचा सन्मान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत महसूल सहाय्यकपदी निवड झालेल्या तेजस डोके,अमोल लंके,प्रियंका करंडे,पुनम भोर,अक्षय निघोट,सिद्धेश पाटकर,रोहन पोहकर,शुभम लंघे यांचे या वेळी सन्मान करण्यात आले.

कार्यक्रमाला मा.श्री.अरुण गीरे (मा. उपअध्यक्ष जि.प.पुणे).डॉ.सुभाष पोकळे (प.स.सदस्य) ,नेताजी गंधारे (वरिष्ठ पोलीस अधिकारी पारगाव पोलीस स्टेशन ),सुनील बाणखेले (मा. सरपंच मंचर ),शिवाजी राजगुरू (उपाध्यक्ष लहुजी वस्ताद समिती) ज्ञानेश्वर विधाटे (स्कूल कमिटी सदस्य),सुप्रिया तांबे (सरपंच शिरदाळे ),शांतारामशेठ जाधव (उद्योजक), मनोज तांबे (मा.सरपंच) आण्णासाहेब बोऱ्हाडे (उद्योजक),वसंतराव जाधव (सचिव भीमाशंकर शिक्षण संस्था),रामदास जाधव (स्कूल कमिटी सदस्य),बाळशीराम वाळुंज (गटप्रमुख)अनिल शेठ डोके (मा. सरपंच खडकवाडी),दिपकराव जाधव (व्हा.चेअरमण),ग्रामपंचायत सदस्य सुरेखा रोडे,जयश्री विधाटे,शालन पंचरास,संतोष करंजखेले,प्रतीक जाधव,दत्ता गवंडी,संकेत वायकर , जगनराव लंके,वामनराव जाधव,संदीप बोऱ्हाडे,मयूर सरडे,बाबाजी बढेकर,बाळासाहेब विधाटे,दत्तात्रेय जाधव,बाळासाहेब बोऱ्हाडे,श्रीकांत विधाटे व पारगाव पोलीस स्टेशनचे पी.आय.गंधारे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा.सरपंच सागर जाधव यांनी केले व आभार उपसरपंच अक्षय विधाटे यांनी मानले .

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.