आरोग्य व शिक्षणक्रीडा व मनोरंजनसामाजिक

भैरवनाथ ने दसरा ते दिवाळी या कालावधीत केले तब्बल ११ कोटी वाहनतारण कर्जाचे विक्रमी वाटप !!

ठेवींनी पार केला ५५५ कोटींचा टप्पा!!

पंचनामा विशेष – शिरूर लोकसभा मतदारसंघाचे प्रथम खासदार तथा पुणे म्हाडाचे अध्यक्ष श्री.शिवाजीराव (दादा) आढळराव पाटील संस्थापक,अध्यक्ष असणाऱ्या तसेच सहकार क्षेत्रातील अग्रगण्य सहकारी संस्था म्हणून संपूर्ण राज्यात ओळख असणाऱ्या भैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित लांडेवाडी (चिंचोडी) या संस्थेने दसरा ते दिवाळी या अल्पकालावधीत नवीन वाहन खरेदीसाठी तब्बल ११ कोटी वाहनतारण कर्जाचे वाटप केले असल्याची माहिती संस्थेचे उपाध्यक्ष श्री.सागर काजळे यांनी पंचनामाशी बोलताना दिली.यावेळी संस्थेच्या संचालिका सौ.कल्पनाताई शिवाजीराव आढळराव पाटील व संचालक मंडळाच्या हस्ते वित्त सहाय्य केलेल्या वाहन मालकांना वाहनाच्या चाव्या प्रदान करण्यात आल्या.

यावेळी बोलताना काजळे म्हणाले की, संस्थेचे संस्थापक,अध्यक्ष मा.खा.श्री.शिवाजीराव (दादा) आढळराव पाटील यांनी होतकरू तरुणांना हक्काचा रोजगार उपलब्ध होण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे.संस्थेच्या माध्यमातून अत्यल्प व्याजदरात व कुठलेही अतिरिक्त खर्च व चार्जेस न आकारता कमीत कमी कालावधीत व्यापारी वाहनांसाठी वित्त पुरवठा उपलब्ध करून दिला आहे. ज्यामुळे तरुणांना हक्काचा रोजगार उपलब्ध झाला आहे.उद्योजक घडवायचे असतील तर त्यांना तंत्र कौशल्य,आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती, आर्थिक गरजांची पूर्तता करणे ही त्रिसूत्री मा.खा.शिवाजीराव आढळराव पाटील,संचालक मंडळ यांनी भैरवनाथ पतसंस्था परिवाराच्या माध्यमातून राबवली आहे.पारदर्शी व्यवहार,लोकांच्या गरजा समजून घेऊन त्यांच्याशी जोडले गेलेली आर्थिक व्यवहाराची नाळ यामुळेच स्थापनेपासून आज तागायत संस्थेला ऑडिट वर्ग अ मिळाला आहे.

सी.बी.एस.प्रणालीचा वापर करत पुणे जिल्ह्यातील ऑनलाइन पद्धतीने काम करणारी भैरवनाथ पतसंस्था ही एकमेव पतसंस्था आहे.याशिवाय लॉकर सुविधा, ए.टी.एम सुविधा, संपूर्ण संगणकीकृत कामकाज करणारी संस्था ग्राहकांना विनम्र व तत्परतेने सेवा देत आहे.सध्या संस्थेच्या मुख्यालयासह १७ शाखा ग्राहकांच्या सेवेसाठी तत्पर आहेत आगामी काळात राजगुरुनगर, जुन्नर,ठाणे त्या ठिकाणी लोकांच्या सेवेसाठी शाखा सुरू करण्यात येणार आहेत.वाढत्या स्पर्धेच्या जगात आपल्या ग्राहकांना आधुनिक व अधिकाधिक तत्पर सेवा देण्यासाठी भैरवनाथ पतसंस्था सदैव अग्रेसर असते.संस्थेने छोटे व्यावसायिक, गृहिणी,विद्यार्थी वर्गांना समोर ठेवून विविध कर्ज योजना यशस्वीपणे अमलात आणल्या आहेत अशी माहिती संस्थेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रमेश खरमाळे यांनी दिली.

या प्रसंगी संस्थेचे संचालक श्री.योगेश बाणखेले,अशोक (मामा) गव्हाणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रमेश खरमाळे,शाखाधिकारी अतुल गुंजाळ,शाखाधिकारी सुजाता काळे,शाखाधिकारी शशिकांत निसाळ,शाखाधिकारी प्रमोद हिंगे,राहुल बढे,शैलेश आढळराव, जालिंदर शेवाळे, संस्थेचे सभासद,हितचिंतक, ग्राहक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Chief Editor

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.