शिरदाळे (ता.आंबेगाव) येथे पारंपारिक पद्धतीने साजरा झाला होळीचा सण!!

शिरदाळे (ता.आंबेगाव) येथे पारंपारिक पद्धतीने साजरा झाला होळीचा सण!!
ग्रामीण भागात आजही सर्व पारंपरिक सण अतिशय उत्साहात आणि आनंदात गोळ्यामेळ्याने एकत्र येत साजरे केले जातात.त्यात शिरदाळे गाव यात कायम आघाडीवर असते.जुने आणि नवीन मंडळी एकत्र येत गावातील सर्व सण,उत्सव साजरे करत असतात.त्यातीलच एक महत्वाचा सण म्हणजे “होळी” गावातील प्रत्येक घरातील मंडळी शेणाच्या गौऱ्या घेऊन येत असतात.त्यानंतर ऊस,एरंडीच्या फांद्या एकत्र करून त्याला मधोमध ठेऊन बाजूने गौऱ्या रचल्या जातात.त्यानंतर होलिका मातेचे पूजन करून त्याला नैवद्य ठेवला जातो.त्यानंतर खोबऱ्याचे तोरण होळीला वाहिले जाते. मग गावातील सर्व पुरुष मंडळी होळीला प्रदक्षिणा घालून बोंबलतात.बोंबलण्याची देखील एक आगळीवेगळी परंपरा आहे.पुरुषांची पूजा झाल्यानंतर गावातील सर्व महिला होळीची पूजा करण्यासाठी येत असतात आणि सोबत हरभरे घेऊन ते होळीच्या आहारावर भाजून ते घरी खायला नेतात.ही शेकडो वर्षांची परंपरा आजही जशीच्या तशी जपण्याचे काम आजही शिरदाळे सारख्या ग्रामीण भागात अतिशय आनंदात आणि उत्साहात संपन्न केले जातात.
जुन्या काळापासून एक म्हण प्रचलित आहे.”होळी जळाली,थंडी पळाली” होळी नंतर खऱ्या अर्थाने उन्हाळा सुरू होतो आणि शेतकरी वर्ग काही प्रमाणात निवांत होतो.हा सण साजरा करताना गावकऱ्यांमध्ये असणारा एकोपा आणि उत्साह खूपच विलक्षण होता.सगळेच सण आम्ही गावकरी मंडळी एकत्र येऊन करत असतो.त्यामुळे ग्रामीण संस्कृती आजही आमच्या गावात जशीच्या तशी टिकून आहे.