आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीसामाजिक

समर्थ ने बनवलेल्या प्रकल्पास जर्मन पेटंट जाहीर!!

समर्थ ने बनवलेल्या प्रकल्पास जर्मन पेटंट जाहीर!!

समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ गुरुकुल,बेल्हे या सीबीएसई मान्यताप्राप्त इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील समर्थ विवेक शेळके या विद्यार्थ्याने तयार केलेल्या “जनरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी फ्रॉम मुव्हिंग व्हेईकल्स ऑन नॅशनल हायवे” या प्रकल्पास जर्मन पेटंट मिळाल्याची माहिती गुरुकुल चे प्राचार्य सतीश कुऱ्हे यांनी दिली.

सध्याच्या धकाधकीच्या काळात सार्वजनिक वाहतूकीच्या ऐवजी स्वतःच्या गाडी ने प्रवास करणे पसंत करतो.त्यामुळे रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.राष्ट्रीय नवीन महामार्ग,राज्य महामार्ग यांची संख्या,बांधकाम वाढले असून परिणामी प्रदूषणाची पातळी देखील वाढलेली आहे.कमी पावसामुळे जलविद्युत केंद्रावरील वीज निर्मितीसाठी धरणांमध्ये पाण्याची कमतरता असल्याने वीज भार नियमनाची समस्या निर्माण झालेली आहे.पारंपरिक पद्धतीने कोळशापासून वीज निर्मिती केली जाते. परंतु त्यामुळे शहरांमध्ये प्रदूषण होण्याचे प्रमाण देखील वाढलेले आहे.ही पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी आणि निसर्गाचे सौंदर्य अबाधित ठेवण्यासाठी रस्त्यावर धावणाऱ्या गाडीच्या वेगाचा वापर करून वीज निर्मिती करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत.सौर पॅनल हा देखील वीज निर्मितीचा एक स्रोत आहे.परंतु पावसाळ्यामध्ये तसेच हिवाळ्यामध्ये कमी प्रमाणात वीज निर्मिती होते.रात्रीच्या वेळी तर वीज निर्मितीची प्रक्रिया कधी कधी पूर्णपणे थांबू शकते.मात्र रस्त्यावर धावणाऱ्या गाड्यांचे प्रमाण दिवसा-रात्री,पावसाळ्यामध्ये,हिवाळ्यामध्ये किंवा कोणत्याही ऋतूमध्ये मुबलक प्रमाणात असते.पर्यावरणाची कुठलीही हानी देखील होत नाही. आणि या वीज निर्मिती प्रक्रियेमुळे प्रदूषण देखील होत नाही.

अशा परिस्थितीमध्ये पारंपरिक ऊर्जा स्रोतांचा उपयोग करून मानवी जीवन सुसह्य करण्याचा प्रयत्न गुरुकुलच्या विद्यार्थ्यांकडून केला जात आहे.अपारंपरिक साधनांद्वारे राष्ट्रीय महामार्गावर चालणाऱ्या वाहनांपासून अमर्यादित वीज निर्मिती करणे शक्य असल्याचे सांगत “सेव्ह इलेक्ट्रिसिटी सेव्ह नेशन” असा संदेश या प्रकल्पातून दिल्याचे समजते.
पवन ऊर्जा,सौर ऊर्जा,पाणी यांसारख्या अपारंपारिक ऊर्जा स्रोतांचा वापर करून वीज निर्मिती केली जाऊ शकते.त्याचप्रमाणे या तंत्राचा वापर करून आपण भरधाव वेगाने वाहणाऱ्या चारचाकी वाहनांच्या वेगाचा वापर करून द्रुतगती मार्गावर असलेले सीसीटीव्ही सर्किट,पोल लाईट यासाठी वीज निर्मिती करू शकतो.ताशी ६० किमी पेक्षा जास्त वेगाने धावणाऱ्या वाहनांच्या दोन्ही चाकांमधील हवेच्या दाबाचा वापर करून वीज निर्मिती केली जाते.तसेच स्ट्रीट लाईट चालू करण्यासाठी याचा वापर होतो.
या विद्यार्थ्याने तयार केलेल्या प्रकल्पाचा उपयोग द्रुतगती मार्ग,राष्ट्रीय महामार्ग,रस्ता दुभाजकावर स्ट्रीट लाईट,टोल प्लाझा,वाहन चार्जिंग पॉईंट,पोलीस स्टेशन,सिग्नल्स,आपत्कालीन विभाग इत्यादी ठिकाणी केला जाऊ शकतो.

सदर विद्यार्थ्याला गुरुकुलचे प्राचार्य सतीश कुऱ्हे,पर्यवेक्षक एच पी नरसुडे,आय टी आय चे प्राचार्य पांडुरंग हाडवळे,विलास सोनवणे,विपुल डेरे,प्रा.निर्मल कोठारी,प्रा.नंदकिशोर मुऱ्हेकर,गौरव पाचपुते यांनी मार्गदर्शन केले.संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहल ताई शेळके,कॅम्पस डायरेक्टर राजीव सावंत,रिसर्च इनोवेशन व इंटरनॅशनलायझेशन सेलचे संचालक डॉ.प्रतिक मुणगेकर,प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर तसेच संकुलातील सर्व प्राचार्य,विभागप्रमुख,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी समर्थ विवेक शेळके या विद्यार्थ्याचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.