आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागात पावसाने मारली दडी,शिरदाळे परिसरात बटाटा पिक आले धोक्यात!!

पंचनामा लोणी (धामणी) प्रतिनिधी – राज्यात सर्वत्र धो- धो कोसळत असलेला पाऊस आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागावर मात्र रुसला आहे.आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागात पावसाने दडी मारल्याने नगदी पीके संकटात सापडली आहेत.याचा सर्वाधिक फटका बसला आहे तो बटाटा पिकाचे आगार म्हणून ओळख असणाऱ्या शिरदाळे गावाला!!

आंबेगावच्या पूर्व भागातील डोंगरमाथ्यावर शिरदाळे हे गाव वसलेले आहे.कधीकाळी बटाटा पिकाचे आगार म्हणून या गावची ओळख!! परंतु गेल्या ४ ते ५ वर्षांपासून बटाटा लागवडीमध्ये मोठ्याप्रमाणात घट झाली असून बि-बियाणे, खते , औषधे यांच्या बाजारभावात झालेली बेसुमार वाढ तसेच निसर्गाचा लहरीपणा या सर्व गोष्टींमुळे शेतकऱ्यांना हव तस उत्पन्न मिळत नाही. त्याचप्रमाणे बाजारभावाची अनिश्चितता त्यामुळे पदरमोड करून भांडवली खर्च उभा करावा लागतो.यामुळे शेतकरी कमी खर्चातील मका, सोयाबीन वाटाणा तसेच कडधान्ये या पिकांकडे वळला आहे.

यावर्षी देखील गावातील फक्त ३० ते ४०% शेतकऱ्यांनी बटाट्याची लागवड केली असून सुरूवातीच्या काळात पाऊसमान चांगले असल्यामुळे ही लागवड प्रामुख्याने दोन टप्प्यात केली आहे, सुरूवातीच्या काळात ज्या शेतकऱ्यांनी बटाटा लागवड केली आहे त्यांचे बटाटा पिक फुलोऱ्यात आले आहे.परंतु ऐन वेळीस पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे.पाण्याचे कुठली ही प्रकारच साधन नसल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.पाऊस वेळेवर नाही झाला तर त्याचा उत्पन्नावर थेट परिणाम होणार असल्याचे बटाटा पिक उत्पादक शेतकरी, व्यावसायिक संदीप तांबे, मा.सरपंच मनोज तांबे, मा. उपसरपंच मयुर सरडे, संतोष रणपिसे यांनी पंचनामाशी बोलताना सांगितले.

Chief Editor

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.