आरोग्य व शिक्षण
वडगावपीर (ता.आंबेगाव) च्या चिमुकल्या भार्गव राजगुडे (वय ६ वर्षे) चा स्केटिंग स्पर्धेत गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सलग ९६ तास स्केटिंग करून नवीन विश्वविक्रम !!

आंबेगाव तालुक्यातील वडगावपीर गावचा चिमुकला भार्गव राजगुडे (वय ६ वर्षे) याने स्केटिंग स्पर्धेत गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सलग ९६ तास स्केटिंग करून नवीन विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे.
भार्गवला पाठबळ देणारे त्याचे वडील विजय आणि त्याच्या सर्व परिवाराचे शिरूर लोकसभा मतदार संघाचे प्रथम खासदार श्री शिवाजीराव(दादा) आढळराव पाटील यांनी अभिनंदन केले आहे. तसेच त्याला आगामी काळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.