आरोग्य व शिक्षणसामाजिक

पारगाव शिंगवे (ता. आंबेगाव) येथे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत टप्पा क्रमांक तिनचे प्रशिक्षण संपन्न!!

पारगाव शिंगवे (ता. आंबेगाव) येथे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत टप्पा क्रमांक तिनचे प्रशिक्षण संपन्न!!

जल जीवन मिशन योजनेअंतर्गत प्रत्येक गावातील प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीस 55 लिटर याप्रमाणे शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे हे मुख्य उद्दिष्ट असून योजना सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी योग्य ती काळजी घेतली पाहिजे असे मत कुंडलिक कोहीनकर यांनी व्यक्त केले.

पारगाव शिंगवे (ता. आंबेगाव) या ठिकाणी जिल्हा परिषद पुणे, पंचायत समिती आंबेगाव,साईप्रेम ग्रामीण विकास संस्था यांच्या माध्यमातून जल जीवन मिशन योजनेअंतर्गत टप्पा क्रमांक तिनचे प्रशिक्षण नुकतेच पार पडलेले यावेळी ते बोलत होते.

यावेळी माधवी देशपांडे,कुंडलीक कोहीनकर पारगावच्या सरपंच श्वेता ढोबळे,मेंगडेवाडीचे सरपंच बाळासाहेब मेंगडे,काठापुरचे सरपंच अशोक करंडे,वाळुंज नगरच्या सरपंच त्रुप्ती वाळुंज,भागडीच्या उपसरपंच लता उंडे,पारगावचे उपसरपंच नितीन ढोबळे,विरेंद्र ढोबळे,विशाल करंडे उपस्थित होते.

माधवी देशपांडे व कुंडलिक कोहीनकर यांनी मार्गदर्शक व माहिती दिली.जल जिवन योजनेच्या तिसऱ्या टप्प्याचे प्रशिक्षण यावेळी पार पडले.या योजने अंतर्गत जल जीवन मिशन योजना अंतर्गत उभ्या राहिलेल्या योजनेचे हस्तांतरण,देखभाल, दुरुस्ती याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

संपूर्ण भारतभर जल जिवन योजनेअंतर्गत हर घर नल से जल!! ही योजना राबवली जात असून यावर मोठ प्रमाणावर खर्च केला जात आहे.ही योजना सुरू असताना स्थानिक ग्रामपंचायतीची महत्त्वाची भुमिका असली पाहिजे.

या योजनेचे पाणी नियोजन कसे केले पाहिजे योजना चालवण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात,पाणी पट्टी वसूली कशी करावी,गावातील शाश्वत विकास याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी पारगाव परिसरातील 20 ग्रामपंचायतीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Chief Editor

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.