आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

माजी विद्यार्थ्यांचा शाळेकडून केला गुणगौरव!!

माजी विद्यार्थ्यांचा शाळेकडून केला गुणगौरव!!

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निमणबेट शाळेत आगळावेगळा उपक्रम साजरा करण्यात आला.
शाळेचा माजी विद्यार्थी हितेश ढोबळे यांनी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची राज्य कर निरीक्षक पदाच्या परीक्षेत उत्तम रँक घेऊन यश मिळवल्याने शाळेकडून त्यांचा सन्मान करण्यात आला.

शाळेतील विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी, आपण काहीतरी वेगळं करावं, अशी उर्मी त्यांच्यात जागृत व्हावी, लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देण्यास विद्यार्थ्यांना प्रेरित करावे, बाल मनातच या परीक्षांविषयी त्यांच्यात उत्कंठा वर्धित होऊन आपणही असेच काहीतरी करावे, अशी प्रेरणा व प्रोत्साहन विद्यार्थ्यांना मिळावे या उद्देशाने हा उपक्रम शाळेत घेण्याचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्य यांनी ठरविले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन मुख्याध्यापक श्री.उंडे सर यांनी केले. मनोगतातून हितेश यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. उराशी मोठी स्वप्न बाळगा. त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करा. न डगमगता, न हारता सतत प्रयत्नशील रहा. प्रयत्नांत सातत्य ठेवा, तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. असा संदेश त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना दिला.

कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री गणेश ढोबळे, उपाध्यक्ष सौ.सुरेखा ढोबळे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य श्री.अशोक ढोबळे, श्री.कैलास ढोबळे,सौ.सुवर्णा ढोबळे त्याचबरोबर हितेशचे वडील श्री ज्ञानेश्वर ढोबळे व भाऊ दयानंद ढोबळे, बहिण काजल ढोबळे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपशिक्षिका चंद्रप्रभा अरगडे यांनी आभार व्यक्त केले.

 

Chief Editor

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.