आरोग्य व शिक्षणसामाजिक

श्री वसंतस्मृती वारकरी प्रथमोपचार सेवा संच” वाटपाच्या अखंडित सेवार्थ भावनेचे दिंड्याकडून कौतुक !!

पंचनामा पुणे प्रतिनिधी – पुण्यातील विविध ठिकाणांहून माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असलेली काही तरुण मंडळी भक्तिमय विचारधारणेतून संघटित होऊन आपल्या “श्री देवदर्शन यात्रा समिती, पुणे” ही संस्था चालवत आहेत. समितीच्या वतीने गेली कित्येक वर्षे नियमित आषाढी पालखी वारी सोहळ्याकरीता भक्तिमय वसा जपत विविध समजोपायोगी उपक्रम राबविले जातात.

याही वर्षी सदस्यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातील विविध भागांतून पुणे येथे वास्तव्यास आलेल्या कित्येक वारकरी दिंड्यांना समितीच्या वतीने अनुभवी वैद्यकीय तज्ञांचा सल्ला घेऊन “श्री वसंतस्मृती वारकरी प्रथमोपचार सेवा संच” चे वाटप करण्यात आले. दिंड्यांच्या प्रमुख चालकांच्या हाती हे संच सुपूर्द केले गेले. वारी दरम्यान प्रथमोपचारासाठी आवश्यक असलेल्या सर्वच बारीक सारीक गोष्टी अन् उपयुक्त औषधे या संचामधून उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्व वारकऱ्यांनी आनंद व्यक्त केला.

समितीच्या वतीने दरवर्षी नवनवीन अभिनव उपक्रम राबवित नावलौकिक वाढविणाऱ्या सदस्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांचे तसेच “श्री वसंतस्मृती वारकरी प्रथमोपचार सेवा संच” वाटपाच्या अखंडित सेवार्थ भावनेचे दिंडीतील सर्व वैष्णव भक्तगणांनी भरभरून कौतुक करून सर्वश्रींना भविष्यातील वाटचाली साठी आशीर्वाद दिले. यास प्रतिसाद म्हणून येणाऱ्या काळात असेच संघटित राहून विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यास प्रयत्नशील राहण्याचा मानस असल्याचे समितीचे प्रमुख सदस्य श्री. उद्धव गेनू थिटे यांनी नमूद केले.

Chief Editor

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.