अवंतिका केतन मेंगडे व अवनीश केतन मेंगडे यांचे तायक्वांँदोच्या बोर्ड ब्रेकिंग व फॉर्म (पुमसे) या क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक!!

अवंतिका केतन मेंगडे व अवनीश केतन मेंगडे यांचे तायक्वांँदोच्या बोर्ड ब्रेकिंग व फॉर्म (पुमसे) या क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक!!
प्रतिनिधी -पारगाव शिंगवे (आंबेगाव)
समीर गोरडे
अमेरिकेच्या न्यू जर्सी राज्यातील लिन्क्रॉफ्ट शहरामध्ये नुकत्याच आयोजित केलेल्या “सहाव्या न्यू जर्सी तायक्वॉदो खुल्या चॅम्पियनशिप २०२३ स्पर्धेमध्ये भारतीय वंशाच्या आणि सध्या अमेरिकेतील न्यू जर्सी येथे वास्तव्यास असलेल्या निरगुडसर (ता. आंबेगाव) येथील वसंत सिताराम मेंगडे (सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक,महाराष्ट्र पोलीस पुणे विभाग)यांची नात अवंतिका केतन मेंगडे (१२ वर्षे) व नातू अवनीश केतन मेंगडे (७ वर्षे) या बहीण भावंडानी तायक्वांदोच्या बोर्ड ब्रेकिंग व फॉर्म (पुमसे) या क्रीडा प्रकारात सुवर्ण पदकाचा मान मिळवला आहे.
अवंतिका फॉर्मस (पुमसे) मध्ये सुवर्ण पदक तर बोर्ड ब्रेकिंग मध्ये कांस्य पदकाची मानकरी ठरली,
अवनीश हा फॉर्मस (पुमसे) मध्ये सुवर्ण पदक आणि बोर्ड ब्रेकिंग मध्ये रौप्य पदकाचा मानकरी ठरला अवनीश याने यापूर्वी झालेल्या अमेरिकन नॅशनल चॅम्पियन स्पर्धेमध्ये देखील सुवर्ण पदक मिळविले आहे.
१७ डिसेंबर २०२३ रोजी झालेल्या सहाव्या न्यू जर्सी तायक्वॉदो खुल्या चॅम्पियनशिप मध्ये वयाच्या ४ वर्ष पासून ते ७० वर्षा पर्यंतच्या जवळ पास ३३० एथिलिट्सनी भाग घेतला होता.