आरोग्य व शिक्षणसामाजिक
निधन वार्ता – लाखणगाव (ता.आंबेगाव ) येथील जून्या पिढीतील प्रगतशिल शेतकरी विठोबा नाथू रोडे पाटील (वय-१०२ वर्षे) यांचे वृध्दपकाळाने निधन


लाखणगाव (ता.आंबेगाव ) येथील जून्या पिढीतील प्रगतशिल शेतकरी विठोबा नाथू रोडे पाटील (वय-१०२ वर्षे) यांचे वृध्दपकाळाने निधन झाले.गावच्या कोणत्याही विकासाच्या कामात ते नेहमी अग्रेसर असायचे.
त्यांच्या मागे दोन मुले, दोन मूली,तीन भाऊ,पुतणे,पुतण्या,सूना,नातवंडे,पंतवडे असा मोठा परिवार असून पुणे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालय संघटनेचे अध्यक्ष व नारायणराव सणस माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वडगाव खुर्दचे प्राचार्य लक्ष्मण रोडे पाटील यांचे वडील तर सरपंच प्राजक्ता रोडे पाटील यांचे ते चूलत सासरे होते.