पत्रकार दिनी मोफत वैद्यकिय तपासणीला उदंड प्रतिसाद!! ठाणे जिल्हा पत्रकार संघ, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ, ठाणे महापालिका आणि जिल्हा माहिती कार्यालयाचा विधायक उपक्रम!!

पत्रकार दिनी मोफत वैद्यकिय तपासणीला उदंड प्रतिसाद!!
ठाणे जिल्हा पत्रकार संघ, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ, ठाणे महापालिका आणि जिल्हा माहिती कार्यालयाचा विधायक उपक्रम!!
ठाणे-आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी दि.६ जाने. रोजी ‘दर्पण’ या वृत्तपत्राची सुरुवात केल्याने हा दिवस ‘पत्रकार दिन’ म्हणुन साजरा होतो. या पत्रकार दिनाचे औचित्य साधुन ठाणे जिल्हा पत्रकार संघ, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ , ठाणे महापालिकाआणि जिल्हा माहिती कार्यालय यांच्या पुढाकाराने शनिवारी, दि.६ जानेवारी रोजी ठाणे महापालिकेतील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात मोफत वैद्यकीय तपासणी शिबीर आयोजित केले होते.आधार रेखा प्रतिष्ठान, कॅन्सर पेशंट एड असोसिएशन, मुंबई यांच्या सहकार्याने पार पडलेल्या या शिबिरात अद्ययावत पध्दतीने १२१ जणांची मोफत वैद्यकिय तपासणी करण्यात आली.
ठामपा मुख्यालयात शनिवारी सकाळी १० वा. या कर्करोग तपासणी शिबिराचा प्रारंभ ठामपा आयुक्त अभिजीत बांगर यांच्या उपस्थितीत झाला. याप्रसंगी,ठामपा अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, संदीप माळवी, ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे,ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे, ज्येष्ठ संपादक दीपक दळवी, दिलीप शिंदे, जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप, आधार रेखा प्रतिष्ठानच्या रश्मी जोशी आदीसह पत्रकार बांधव उपस्थित होते. या कर्करोग तपासणी शिबिरात पत्रकारांची रक्त तपासणी, नाक-कान- घसा तपासणी,स्त्रीरोग तज्ञांकडून स्त्रियांची तर तज्ञ फिजीशियनकडून पुरुषांची तपासणी आणि मुख्यत्वे: व्यसनासंबधी जागरूकता करण्यात आली. शिबिरातील प्रत्येक तपासणीचे रिपोर्टस लाभार्थीना देण्यात येणार आहेत. यावेळी मनपा आयुक्त बांगर यांनी, पत्रकार संघांने दोन्ही दिवस विधायक उपक्रम राबवुन उल्लेखनीय कामगिरी केल्याचे सांगुन पुढील काळात ठाणे महापालिकेतर्फेही महिला पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांची मोफत मॅमोग्राफी तपासणी करण्याच्या सुचना दिल्या. आज झालेल्या आरोग्य तपासणी शिबिरात ठाण्यासह कल्याण शहापूर मुरबाड येथील पत्रकारांनी सहभाग घेतला.