आंबेगाव तालुक्यातील शिरदाळे येथील शाळकरी मुलांनी गावातून मिरवणूक काढत केली शिवजयंती साजरी!!
लहानग्या चिमुकल्यांना देखील छत्रपतींबद्दल आदर आणि आस्था!!

लहानग्या चिमुकल्यांना देखील छत्रपतींबद्दल आदर आणि आस्था!!
आंबेगाव तालुक्यातील शिरदाळे येथील शाळकरी मुलांनी गावातून मिरवणूक काढत केली शिवजयंती साजरी!!
काल संबंध महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली.थोरामोठयांसह सर्वांनीच ज्याला जसे जमेल तसे महाराजांच्या जयंती निमित्त कार्यक्रम घेण्यात आले.
शिरदाळे(ता.आंबेगाव) येथील लहान मुलांनी काल एक शक्कल लढवत अनोख्या पद्धतीने शिवजयंती साजरी केली.या मुलांना कुठं तरी जुने पावती पुस्तक सापडले योगायोगाने ते देखील शिवजयंतीचेच पुस्तक होते!!मग काय पोरांनी सकाळपासूनच घरोघरी जाऊन वर्गणी,देणगी गोळा करायला सुरुवात केली.कोणी दहा,कोणी वीस तर कोणी पन्नास अशी वर्गणी गोळा करून पोरांनी हजार रु.पर्यंत रक्कम जमा केली.त्या पैशातून महाराजांचा पूर्णाकृती पुतळा आणणार असल्याचे ओम रणपिसे,ऋत्विक सरडे या शाळकरी मुलांनी सांगितले.
मग सकाळी ११ वा.आरास करून महाराजांच्या मूर्तीची स्थापना करून महाराजांची आरती डिजे वर लावण्यात आली.(डी.जे.म्हणजे तो पण छोटच, नुकतीच यात्रा झाली त्या यात्रेत घेतलेला) मग सायंकाळी ढोल,ताशा(छोटे) आणि त्यांचा मित्रपरिवार मग त्यात ओम जगदीश रणपिसे,ऋत्विक सरडे,ओम देविदास रणपिसे,प्रतीक तांबे,सुदर्शन भोर,ऋषभ सरडे,शिवम रणपिसे,अंश सरडे,नचिकेत तांबे,तनिष्का रणपिसे,ऋतू मिंडे,तेजस मिंडे,रिद्धी तांबे,कनिष्का तांबे हे सर्व बालकलाकार गावातून पालखी मार्गाने मार्गस्थ झाले.
त्यानंतर मंदिरासमोर येताच छत्रपतींच्या नावाचा जयघोष करत भगवी पताका फडकवण्यात आली. हा सगळा प्रकार ग्रामस्थ खूप कुतूहलाने पाहत होती. यावेळी फुलांची उधळण करत मिरवणुकीची सांगता करण्यात आली.
आज छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल प्रत्येकाच्या मनात आदर आणि सन्मान आहे आणि तो असायलाच हवा कारण महाराजांना आपण दैवतासमान मानतो.या बालकांनी महाराजांबद्दल दाखवलेला हा आदर सन्मान नक्कीच कौतुकास पात्र आहे. म्हणूनच राजांचा इतिहास हा आजही जगात श्रेष्ठ समाजाला जातो.त्या मातीतले आपण आहोत याचा देखील आपल्याला अभिमान असायला हवा.
“छत्रपती शिवाजी महाराज की…जय…!!”
शब्दरचना:- श्री.मयुर संभाजी सरडे (सुप्रसिद्ध निवेदक)