अध्यात्मिक प्रदर्शनीद्वारे भक्तीसाठी ज्ञानची पर्वणी – ब्रह्मकुमारी वासंती दीदी,सिन्नर येथे बारा ज्योतिर्लिंग अध्यात्मिक प्रदर्शनी उद्घाटन सोहळा संपन्न!!

अध्यात्मिक प्रदर्शनीद्वारे भक्तीसाठी ज्ञानची पर्वणी – ब्रह्मकुमारी वासंती दीदी
सिन्नर येथे बारा ज्योतिर्लिंग अध्यात्मिक प्रदर्शनी उद्घाटन सोहळा संपन्न!!
सिन्नर – परमात्म्याच्या नाम रूप देश काल कर्तव्याचे वर्णन या द्वादश ज्योतिर्लिंग अध्यात्मिक मेळा मधून मिळते. हा अध्यात्मिक मेळावा सर्व भक्तांसाठी ज्ञानाचे द्वार उघडणारा आहे. या अमूल्य ज्ञानधनांद्वारे मनुष्य आत्म्याला सुख शांती अवश्य प्राप्त होईल. त्यामुळे एकाच छताखाली लाभलेल्या या द्वादश ज्योतिर्लिंगाचे प्रत्येकाने अवलोकन करून आपले भाग्य अधिक उज्वल बनवावे असे प्रतिपादन राजयोगिनी ब्रह्माकुमारी वासंती दीदीजी, जिल्हा मुख्य संचालिका नाशिक यांनी केले.
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय नाशिक रोड सेवा केंद्र तर्फे सिन्नर येथील भैरवनाथ मंदिर परिसरात भव्य द्वादश ज्योतिर्लिंग दर्शन अध्यात्मिक मेळा चे आयोजन दिनांक 28 फेब्रुवारी ते 3 मार्च पर्यंत करण्यात आले. या मेळाव्याचl उद्घाटन समारोह 28 फेब्रुवारी संस्थेच्या जिल्हा मुख्य प्रशासिका राजयोगिनी ब्रह्माकुमारी वासंती दीदीजी यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून श्रीराम कृष्ण आरोग्य संस्थांचे स्वामी श्री कंठानंद महाराज, नाशिक जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शितलताई सांगळे, जिल्हा परिषद माजी सदस्य सीमंतिनी कोकाटे, डाॅ. पं. पंकज शास्त्री घेवाडे, भैरवनाथ ज्येष्ठ नागरिक संघाचे सरचिटणीस जनार्दन दातीर, चिंतामणभाई भगत, माजी नगरसेवक किशोर भगत, योगेश जोशी, ब्रह्माकुमारी शक्ती दीदी ,ब्रह्माकुमारी विना दीदी, ब्रह्माकुमारी मनीषा दीदी, ब्रह्माकुमारी ज्योती दीदी, ब्रह्माकुमारी गोदावरी दीदी आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली. कुमारी खुशीने स्वागत कृत्य केले तर ब्रह्माकुमार महेंद्र भाई यांनी संस्थेचा परिचय करून दिला. मेळाव्याचा उद्देश ब्रह्माकुमार दिलीप भाई यांनी स्पष्ट केला तर सूत्रसंचालन ब्रह्माकुमारी उज्वला दीदी यांनी केले.
आपल्या वक्तव्यात पुढे दिदिजी म्हणाल्या की भगवंताचे नाव सर्वजण घेतात, भगवंताला मानतात सुद्धा, मात्र त्याच भगवंताला जाणत नाही! भगवंताला ते ओळखत नाही. परमात्मा सत-चित-आनंद स्वरुप आहे हे जाणून घेण्यासाठीच हा मेळा आयोजित केला असल्याचे दीदींनी याप्रसंगी सांगितले.
श्रीकंठानंद महाराज यांनी सांगितले की आपल्याला रामाचे राज्य प्रस्थापित करायचे आहे. राम सज्जन होते पण आळशी नाही. असे सज्जन रस्त्यावर फिरले पाहिजे. राम सज्जन होते सक्रिय होते व साहसी होते. प्रत्येकांमधील सज्जनता सक्रियता व साहस जागृत झाले पाहिजे, जेणेकरून नाशिक हे पुण्यभूमी अयोध्या म्हणून प्रसिद्ध होईल.
डाॅ. पं. पंकज शास्त्री घेवाडे – यांनी आपल्या मनोगत सांगितले की द्वादश ज्योतिर्लिंग या नावाजवळ जरी आपण गेलो तरी त्या शक्तीची अनुभूती आपल्याला होते त्यामुळे ब्रह्माकुमारी संस्थेचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य असल्याचे पंडित शास्त्री यांनी याप्रसंगी सांगितले.
आदरणीय वासंती दीदी जी यांच्या मार्गदर्शनाखाली ब्रह्माकुमारी संस्थेचे कार्य अतिशय उत्तमरित्या चालू आहे. आज जरी दीदीजींचे वय 75 वर्षापेक्षा अधिक असले तरी त्यांचा उत्साह हा वाखाण्याजोगा आहे. मनःशांती प्राप्त करून देणारा येथील राजयोगा मेडिटेशन अतिशय पावरफुल आहे. कोणताही आजार बरा करण्याची ताकद या राजयोगात आहे. सोबतच याच राज योगाच्या माध्यमातून आपणास ईश्वर प्राप्ती ही होऊ शकते. अशा या परोपकारी संस्थेच्या कोणत्याही कार्यात सहभागी व्हायला आवडेल असे मनोगत शितलताई सांगळे यांनी व्यक्त केले.
मान्यवरांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन फीत कापून करण्यात आले. द्वादश ज्योतिर्लिंग व आध्यात्मिक चित्र प्रदर्शनी बघून उपस्थित पाहूणे भारावून गेले. या अध्यात्मिक ज्ञान प्रकाशातून सर्वांना अवश्य योग्य मार्गदर्शन मिळेल असा आशावाद उपस्थितांनी प्रकट केला. हा अध्यात्मिक द्वादश ज्योतिर्लिंग मेळा 3 मार्चपर्यंत खुला असणार असून या मेळाव्याचा सर्व भक्तगण विद्यार्थी महिला पुरुष यांनी पुरेपूर लाभ घ्यावा व पुण्याचे वाटेकरीव्हावे असे आवाहन ब्रह्माकुमारी वासंती दीदीजी यांनी या प्रसंगी केले.
कार्यक्रमात मोठ्या संख्येने नाशिक व सिन्नर पंचक्रोशीतून नागरिक व ब्रह्माकुमारी सदस्य उपस्थित होते.