पारगाव (शिंगवे ) येथे कलशारोहण समारंभ संपन्न!!

पारगाव (शिंगवे ) येथे कलशारोहण समारंभ संपन्न!!
मधु गायकवाड अवसरी
पारगाव येथील लबडे मळ्यात श्री महादेव मंदिर प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण श्री मुर्ती मिरवणूक सोहळा संपन्न झाला .
देवता पुजन,होमहवन,मुर्तीस जलाभिषेक तसेच ह.भ.प. सुदाम महाराज बनकर(साकोरी) यांच्या शुभहस्ते मुर्ती प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
ज्ञानेश्वर प्रासादिक भजनी मंडळ,तुकाई संगीत भजनी मंडळ,ढोबळेमळा,अहिल्यादेवी प्रासादिक भजनी मंडळ गोलापूर (कडूस)यांचा भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी शरद सहकारी बँकेचे संचालक दौलत लोखंडे,माजी चेअरमन दत्तात्रय वाव्हळ,माजी उपसरपंच विठ्ठल ढोबळे, ग्रामपंचायत सदस्या रेखा लबडे,दत्ताराम वैद्य,दत्तात्रय पोटे,रोहिदास भागवत,ज्ञानेश्वर पोटे,नामदेव पोटे,परमेश्वर पोटे,सुरज पोटे,चांगदेव पोटे,बाळासाहेब पोटे,श्रीकृष्ण पोटे,योगेश पोटे,सतीश पोटे,साईनाथ पोटे,दिपक पोटे,किरण पोटे,ह.भ.प.निवृत्ती महाराज लोखंडे,आकाश पोटे,सुनील पोटे,आदी मान्यवर तसेच सर्वांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.लबडे मळ्यातील ग्रामस्थ उपस्थित होते.
पारगाव (ता .आंबेगाव ) येथील लबडे मळ्यात महादेव मंदिराचा कलशारोहण समारंभ संपन्न झाला .