जनहित पतसंस्थेच्या चेअरमनपदी जनार्दन (आबा) गावडे बिनविरोध !!


पंचनामा प्रतिनिधी – आदर्श ग्राम गावडेवाडी (ता.आंबेगाव) येथील जनहित बिगरशेती पतसंस्थेच्या चेअरमनपदी जनार्दन बाळकृष्ण उर्फ आबा यांची बिनविरोध निवड झाली आहे .
पतसंस्थेचे या पूर्वीचे चेअरमन सत्यविजय शिंदे यांनी आपल्या वैयक्तिक कारणामुळे पदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते शुक्रवारी (ता .२५ ) रोजी मंचर येथे सहाय्यक निबंध कार्यालयात निवडणूक प्रक्रिया पार पडली . यावेळी जनार्दन (आबा ) गावडे यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी विवेक वाघमारे यांनी जनार्दन गावडे यांची अध्यक्षपदी निवड झाल्याचे जाहीर केले.
नवनिर्वाचित चेअरमन जनार्दन आबा गावडे यांचा सत्कार मंचर येथील आंबेगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती निलेश थोरात यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी पतसंस्थेचे उपाध्यक्ष सुरेश भोर ,संचालक बाबाजी टेमकर, दिलीप देवरामशेठ गावडे ,यासिन इनामदार ,प्रवीण गावडे ,मच्छिंद्र शंकर जारकड संचलिका अलका निघोट, सुनीता आदक, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संचिता निघूट सहाय्यीका कोमल कराळे आदी हजर होते संस्थेचे निमंत्रित सदस्य लक्ष्मण पिंपळे व गावडेवाडी ग्रामस्थांनी जनार्दन आबा गावडे यांचे अभिनंदन केले आहे.
या पुढील काळात सर्व संचालकांना व सभासदांना विश्वासात घेऊन पतसंस्थेची प्रगती होईल याकडे लक्ष देणार असल्याचे नवनिर्वाचित चेअरमन जनार्दन आबा गावडे यांनी सांगितले.
