आरोग्य व शिक्षणक्रीडा व मनोरंजन

भैरवनाथचे कार्य इतर सहकारी संस्थांसाठी प्रेरणादायी – मा.सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील

पंचनामा विशेष – क्षेत्र कोणतेही असो त्यात व्यावसायिक स्पर्धा ही ठरलेली असते.मात्र व्यवसाय करत असताना केवळ नफा कमावणे हाच उद्देश डोळ्यासमोर न ठेवता सामाजिक बांधिलकी जपणे हे देखील सहकारी संस्थेचे कर्तव्य आहे आणि ही सामाजिक बांधिलकी भैरवनाथ पतसंस्थेने जपली आहे त्यामुळे भैरवनाथ पतसंस्थेचे कार्य इतर सहकारी संस्थांसाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे मा. सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले.भैरवनाथ पतसंस्थेच्या डिंभे शाखा स्थलांतर कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.

भैरवनाथ पतसंस्थेने नेहमीच सभासदांच्या व ग्राहकांच्या हिताचा विचार केला आहे. सुशिक्षित व बेरोजगार तरुणांना, महिलांना विविध उद्योग व्यवसायासाठी संस्थेने कमीत कमी कालावधीत व अत्यल्प व्याजदरात कर्ज पुरवठा केला आहे. केवळ नफा कमावणे हाच उद्देश डोळ्यासमोर न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत संस्थेने नेहमीच सर्वसामान्यांना मदतीचा हात दिला असून या पुढील काळातही हे कार्य असेच सुरू राहणार असल्याचे संस्थेचे संस्थापक,अध्यक्ष, पुणे म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगितले.

आज अखेर संस्थेचा स्वानिधी ६२ कोटी रुपयांचा असून संस्थेकडे ५६० कोटी रुपयांच्या आहेत.संस्थेने ४५० कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. तर संस्थेची गुंतवणूक १७० कोटी इतकी आहे. संस्थेचा संमिश्र व्यवसाय १०३० कोटी रुपयांचा आहे.संस्थेच्या मुख्यालयासहित १७ शाखांचे कामकाज सी.बी.एस.पद्धतीने सुरू असल्याची माहिती संस्थेचे उपाध्यक्ष सागर काजळे यांनी या प्रसंगी दिली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिवसेनाप्रमुख, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त उपस्थितांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

यावेळी संस्थेच्या संचालिका कल्पनाताई आढळराव पाटील, संचालक हनुमंत तागड,महेश ढमढेरे, योगेश बाणखेले, भिकाजी बोकड,अशोक गव्हाणे, बाजार समिती मा.सभापती प्रकाश घोलप, अध्यक्ष रा.काँग्रेस आंबेगाव विष्णू काका हिंगे, संचालक प्रदीप आमुंडकर, डिंभे गावच्या सरपंच मयुरी लोहकरे, उपसरपंच शुभांगी राक्षे, तंटामुक्ती अध्यक्ष रामदास राक्षे, मा.सभापती संजय गवारी, पी. के. बोऱ्हाडे, प्रवीण पारधी, मा.जिल्हा परिषद सदस्य इंदुबाई लोहकरे, मा.पंचायत समिती सदस्य जनाबाई उगले, सुभाष तळपे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रमेश खरमाळे, शाखाधिकारी अर्जुन आढळराव, शालिवान गव्हाणे, शशिकांत निसाळ, रामदास चासकर, सुजाता काळे, शैलेश आढळराव उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल अंकुश यांनी केले तर उपस्थितांचे आभार संचालक महेश ढमढेरे यांनी मानले.

Chief Editor

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.