आरोग्य व शिक्षणसामाजिक

जवळे (ता.आंबेगाव) येथे संपन्न झाले वाचनालयाचे उद्घाटन!!

पंचनामा पारगाव (शिंगवे) प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यातील सर्वार्थाने प्रगतशील गाव म्हणून ओळख असणाऱ्या जवळे गावात मुख्यमंत्री पंचायत राज अभियान उत्स्फूर्तपणे राबवण्यात येत असून गावात पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी अर्चना कोल्हे व विस्तार अधिकारी हुजरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंभू महादेव वाचनालयाचे उद्घाटन आज जवळे गावच्या आदर्श सरपंच सौ. वृषालीताई उत्तम शिंदे पाटील व उपसरपंच मनिषाताई टाव्हरे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी सरपंच यांनी सांगितले की,या ठिकाणी स्पर्धा परीक्षेची ही पुस्तके उपलब्ध करण्यात येतील.वाचनातून माणूस घडतो, सुसंस्कृत बनतो त्यामुळे प्रत्येकाने वाचन केलेच पाहिजे. वाचनातून शिक्षणाची आवड निर्माण होते.

यावेळी चंद्रकला गायकवाड ,हरिचंद्र शिंदे ,दत्तात्रय लायगुडे, अमोलराव वाळुंज, शुभांगी खालकर, संगीता साबळे, प्रमिला गावडे, मा.उपसरपंच पोपटशेठ शिंदे, महेश लोखंडे , चिधू साबळे ,पोपटराव लायगुडे ,रामचंद्र गावडे, रमण लायगुडे, श्रीकांत वायकर , शीला साबळे ग्रामपंचायत अधिकारी भूपेंद्र वाळुंज, अशोक लोखंडे यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Chief Editor

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.