आरोग्य व शिक्षणसामाजिक

पारगाव (शिंगवे) येथे सरकार मान्य स्वस्त धान्य दुकानाचे सारथ्य करणार मुक्तादेवी स्वयंसहायता बचत गट!!

पंचनामा पारगाव (शिंगवे) प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यातील सर्वार्थाने प्रगतशील गाव म्हणून ओळख असणाऱ्या पारगाव (शिंगवे) येथे सरकारमान्य स्वस्त धान्य दुकान मुक्तादेवी स्वयंसहायता बचत गट यांच्या माध्यमातून चालवले जाणार आहे. प्रातिनिधीक स्वरूपात या दुकानातून आज ग्रामस्थांना रेशन वाटप करण्यात आले.

सर्वसामान्य व गरीब कुटुंबांना अल्प रकमेत रेशनिंग धान्य उपलब्ध व्हावे यासाठी शासन सदैव प्रयत्नशील आहे.बचत गटाच्या माध्यमातून हे रेशनिंग वाटप केले जाणार असल्याने महिला सक्षमीकरणास पाठबळ मिळणार आहे.

या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते बजरंग देवडे,विठ्ठल दातखिळे, सुधाकर लोखंडे,चंद्रकांत आसवारे, दत्तात्रय लोले, सुधीर ढोबळे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Chief Editor

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.