आरोग्य व शिक्षणसामाजिक
मेंगडेवाडी (ता.आंबेगाव) येथे शिवसेनाप्रमुखांना आदरांजली अर्पण!!


पंचनामा पारगाव (शिंगवे) प्रतिनिधी – आज हिंदूहृदयसम्राट वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त मेंगडेवाडीत शिवसैनिकांच्या वतीने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी जिल्हा परिषद मा.उपाध्यक्ष अरुण भाऊ गिरे, युवा सेना जिल्हा समन्वयक सुनील गवारी,ग्रा.पं. सदस्य विशाल मेंगडे, पोलीस पाटील दशरथ मेंगडे, ज्येष्ठ शिवसैनिक चेअरमन सखाराम गवारी तुकाराम भोर मामा,रघुनाथ मेंगडे, तुकाराम दांगट, नवनाथ दांगट, मनोहर गवारी, तुळशीराम गवारी, सुयोग मेंगडे, साईनाथ मेंगडे, भास्कर मेंगडे, अजित गवारी, व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होती.





