धामणी (लोणी) येथे शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतीदिन संपन्न !!


पंचनामा लोणी (धामणी) प्रतिनिधी – आजही हिंदुहृदयसम्राट बाळसाहेब ठाकरे यांचे प्रत्येक मराठी माणसाच्या मनात एक अढळ स्थान आहे. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाले. आज त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त धामणी येथे पंचांच्या पारावर सौ. गुणवंती काकी क्षिरसागर याच्या हस्ते शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे प्रतिमा पुजन करण्यात आले.
यावेळी बोलताना पंचायत समिती सदस्य रविंद्र करंजखेले म्हणाले की,वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे मराठी अस्मितेचे प्रतिक होते.आमच्या सारख्या लाखो कार्यकर्त्यांना घडवण्यात शिवसेनाप्रमुखांचा मोलाचा वाटा आहे.

सरपंच अक्षयराजे विधाटे यांनी बोलताना सांगितले की,आजही वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची उणीव सदैव जाणवते. आजच्या राजकीय घडामोडी मध्ये शिवसेनाप्रमुख असते तर महाराष्ट्राचे चित्र खुप वेगळे असते. आजही बाळासाहेब ठाकरे यांनी घालुन दिलेल्या ८०% समाजकारण व २०%राजकारण या सुत्राने आम्ही काम करत आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.

यावेळी मा.सरपंच सागर जाधव , उपसरपंच कैलास वाघ,दत्ता गवंडी , मच्छिंद्र आमाप (मा ग्रा.प सदस्य) , अमोल जाधव , रोहित भुमकर , गणपत भंडारकर ,रूपेश विधाटे , माधवराव बोऱ्हाडे , सुजल विधाटे , जगदीश रणपिसे ,बाळासाहेब भुमकर , तानाजी गाडेकर , दिनकर रोकडे , कैलास बढेकर ,संतोष वायकर ,तुकाराम विधाटे ,चंद्रकांत जाधव आदि ग्रामस्थ उपस्थित होते .




