आरोग्य व शिक्षणसामाजिक
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारगाव (शिंगवे) येथे उत्साहात संपन्न झाला बालदिन; मा.उपसरपंच सचिन अस्वारे यांच्याकडून शाळेसाठी १० हजार किमतीचे पोषण आहार भांडी साहित्य !!


पंचनामा पारगाव (शिंगवे) प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यातील सर्वार्थाने प्रगतशील गाव म्हणून ओळख असणाऱ्या पारगाव (शिंगवे) येथील मॉडेल स्कूल म्हणून नावारूपाला आलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बालदिन उत्साहात संपन्न झाला.
यावेळी पारगावाचे मा.उपसरपंच सचिन अस्वारे यांच्याकडून शाळेची भौतिक गरज ओळखून शालेय पोषण आहारासाठी लागणारे १० हजार किमतीचे बादली,टोप, झाकण आदी साहित्य भेट देण्यात आले.

यावेळी पारगावच्या सरपंच श्वेता ढोबळे, ग्रामपंचायत सदस्य काळुराम लोखंडे,शंकर देवडे, अशफाक शेख, मुख्याध्यापक लबडे सर,सहशिक्षक विजय वळसे, सिनलकर मॅडम टेमकर मॅडम उपस्थित होते.




