आरोग्य व शिक्षणसामाजिक

जवळे (ता.आंबेगाव) ग्रामपंचायत झाली हायटेक !!

पंचनामा पारगाव (शिंगवे) प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यातील ग्रामपंचायत जवळे या ठिकाणी मुख्यमंत्री पंचायत राज अभियान हा शंभर दिवसातील एक उत्कृष्ट उपक्रम हाती घेण्यात आला आहे.गावातील सर्व घरांवरती क्यू.आर.कोड सहित मिळकत धारकांचे नाव ,मालमत्ता क्रमांक अशा आशयाच्या पाट्या लावण्याचे काम सुरू आहे यामुळे मिळकत धारकांना आपली घरपट्टी घरबसल्या भरता येणार आहे.

या क्यू.आर.कोडनुसार नागरिकांना एका क्लिक वरती मिळकत धारकांना सर्व माहिती उपलब्ध होणार आहे. तसेच ऑनलाइन कर भरणे व पावती मिळवणे ही सोपे होणार आहे यामुळे कर आकारणी मध्ये पारदर्शकता व कर भरण्याकरिता ग्रामस्थांचा सहभाग वाढू शकतो.

सर्व घरांच्या दरवाजांवरती क्यू.आर. कोड सहित नेमप्लेट लावण्याचे काम सुरू आहे अशी माहिती जवळे ग्रामपंचायतच्या आदर्श सरपंच सौ. वृषालीताई उत्तम शिंदे पाटील यांनी दिली.

यावेळी संध्या वाळुंज,पार्वताबाई लोखंडे व श्रीकांत वायकर यांचा आंबेगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी अर्चना कोल्हे मॅडम व विस्तार अधिकारी हुजरे साहेब यांच्या समक्ष क्यू.आर.कोड वरती ऑनलाईन पद्धतीने आपली घरपट्टी जमा केली त्यांचा सत्कार साहेबांच्या हस्ते करण्यात आला व त्यांना केशर आंब्याचे कलमी रोप मोफत ग्रामपंचायतच्या वतीने भेट देण्यात आले.

यावेळी संचालक बाबासाहेब खालकर ,अंकुश गायकवाड, यशवंतराव वाळुंज,उपसरपंच मनीषा टाव्हरे चंद्रकला गायकवाड ,संगीता साबळे, रामदास शिंदे, संजय शिंदे ,दत्तात्रय लोखंडे, राजाराम शिंदे ,नवनाथ शिरतार,शालन सोनवणे, शशिकला गावडे, सुजाता पोखरकर, अशोक लोखंडे, ग्रामरोजगार सेवक भूपेंद्र वाळुंज,ग्रामपंचायत अधिकारी शिला साबळे, मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

Chief Editor

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.