लोणी (ता.आंबेगाव) येथे श्री भैरवनाथ विद्याधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात फोर्टीन ट्रीज फाउंडेशन व ग्रामपंचायत लोणी यांच्या संयुक्त विद्यमाने एक पेड माँ के नाम या उपक्रमांतर्गत शालेय विद्यार्थ्यांना फळ झाडांचे वाटप !!


पंचनामा लोणी (धामणी) प्रतिनिधी – लोणी (ता.आंबेगाव) येथे श्री भैरवनाथ विद्याधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात फोर्टीन ट्रीज फाउंडेशन व ग्रामपंचायत लोणी यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती निमित्ताने बालदिनाचे औचित्य साधून ‘ एक पेड माँ के नाम ‘ या उपक्रमांतर्गत ४७५ फळ झाडांचे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले.
यावेळी फोर्टीन ट्रिजचे व्यवस्थापक अनंत तायडे यांनी सांगितले की आत्तापर्यंत लोणी परिसरामध्ये २५००० हजार फळ झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले आहे.त्या सर्व झाडांचे संगोपन चालू आहे.आणखी पंचवीस हजार फळ झाडांचे वृक्षारोपण करण्यात येणार आहे.त्यातून स्थानिक नागरिकांना रोजगार उपलब्ध झाला आहे.

माजी विद्यार्थी विकास प्रबोधिनीने याआधी दहा हजार झाडांचे वृक्षारोपण केले आहे.यावेळी सरपंच सावळेराम नाईक यांनी गावातील तिन्ही वार्डातील उत्कृष्ट झाड संगोपन,संरक्षण करणाऱ्यां विद्यार्थ्याला बक्षीस दिले जाईल असे जाहीर केले.
यावेळी निसर्गप्रेमी व कवयित्री सपना राठोड, सुरेखा लाडके, उपसरपंच राहुल आढाव,मा.उपसरपंच अदिका खोमणे, प्रकाश गायकवाड, शरद सहकारी बँकेचे संचालक अशोक आदक पाटील, समाजभूषण कैलासराव गायकवाड, प्राचार्य रविंद्र ढगे व त्यांचे सर्व शिक्षक सहकारी,व प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक व त्यांचे सर्व शिक्षक सहकारी, संतोष पडवळ, ग्रामविकास अधिकारी अनिल टेमकर,पोलीस पाटील संदीप आढाव, माजी विद्यार्थी विकास प्रबोधिनीचे कार्यवाहक अरूण साकोरे,मा.सरपंच रंजना लंके,नवकवियत्री वर्षाली देशमुख,ग्रामपंचायत सदस्य मंगल गायकवाड,राजेंद्र वाळुंज, पुष्पाताई रोकडे,सीमा वाळुंज, सावित्री ग्राम संघाच्या अध्यक्षा मोनिका नाईक,गीतांजली कदम,ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.

लोणी (ता.आंबेगाव ) येथील विद्यालयातील विद्यार्थ्यांना वृक्ष रोपे देताना मान्यवर




