आरोग्य व शिक्षणसामाजिक

जारकरवाडीच्या वैदवाडी येथील संरक्षक कठडा नसलेली डिंभे धरणाची वितरिका ठरतेय अपघाताचे कारण!!

आंबेगाव तालुक्यातील सर्वार्थाने प्रगतशील गाव म्हणून ओळख असणाऱ्या जारकरवाडीच्या वैदवाडी परिसरातील डिंभे धरणाच्या उजव्या कालव्याची वितरिका अपघाताचे कारण ठरत आहे.

वैदवाडी – पोंदेवाडी रस्त्यावर मारुती बढेकर यांच्या शेताच्या उजव्या बाजूला असणाऱ्या वितरीकेला संरक्षक कठडे नसल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना ही वितरिका लक्षात येत नाही. तसेच या वितरिकेच्या दोन्ही बाजूला तीव्र उतार व चढ असल्याने वाहनांना वेग मर्यादा राहत नाही. संरक्षक कठडा नसल्याने वितरिका लक्षात येत नाही ज्यामुळे वाहने अपघातग्रस्त होतात.

दोनच दिवसांपूर्वी येथे ऊसाची वाहतूक करणारी गाडी अपघातग्रस्त झाली होती. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.मात्र उजव्या बाजूला खोल खड्डा व ऊसाचे क्षेत्र असल्याने अपघात झाल्यास जीवितहानीची शक्यता वाढली आहे. या वितरिकेवर संबंधित विभागाने त्वरित संरक्षक कठडा आता भिंत बांधवी अशी मागनी जारकरवाडी गावचे सामाजिक कार्यकर्ते विशाल कापडी, दीपक कापडी यांनी पंचनामाशी बोलताना केली.

Chief Editor

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.