आरोग्य व शिक्षणक्रीडा व मनोरंजन
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गवारीमळा (मेंगडेवाडी) येथे उत्साहात संपन्न झाला बालदिन!!


पंचनामा लोणी (धामणी) प्रतिनिधी – विविध व अभिनव शालेय उपक्रम राबविण्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गवारीमळा (मेंगडेवाडी) येथे बालदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

या निमित्ताने अंगणवाडी मधील विद्यार्थ्यांना ड्रायफूट व बिस्किटांचे वाटप करण्यात आले.





यावेळी मेंगडेवाडी गावचे सरपंच बाळासाहेब मेंगडे, उद्योजक संजयशेठ गोरे, ग्रामपंचायत सदस्य विशाल गवारी, माजी सरपंच रेश्मा गवारी, लता मेंगडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष स्वप्नील गवारी, मा.उपाध्यक्ष महेंद्र गवारी, मुख्याध्यापक अजित सोनवणे, राहुल पाटील, माजी मुख्याध्यापक वैशाली काळे,अंगणवाडीच्या कीर्ती गवारी, प्रसिद्ध बैलगाडा मालक संतोष गवारी, संदीप गवारी आदी मान्यवर उपस्थित होते.







