आरोग्य व शिक्षणसामाजिक

संदीप पाटील ग्रामसेवक विरोधात लाल बावटा कामगार संघटनेचा संताप

पंचनामा प्रतिनिधी – शौकत माणगावे – ग्रामपंचायत वाडीपीर येथील लाल बावटा बाधकाम कामगार संघटना (CITU) चे पदाधिकारी व सदस्य हे ग्रामसेवक संदीप पाटील यांच्या कार्यप्रणालीमुळे संतप्त झाले आहेत. ग्रामसेवकांकडे कोणत्याही कामासाठी गेल्यास “वरून आदेश नाहीत”, “संदेश आलेला नाही” अशी टोलवाटोलवीची उत्तरे देत कामांना नकार दिला जातो, असा आरोप संघटनेने केला आहे.
या संदर्भात लाल बावटा कामगार संघटनेचे अध्यक्ष माणगावे व उपाध्यक्ष इंगलजकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, “ग्रामसेवकांच्या अकार्यक्षमतेमुळे आमची कोणतीही कामे पूर्ण होत नाहीत.” या पार्श्वभूमीवर सर्व पदाधिकारी व सदस्यांनी जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) तसेच गटविकास अधिकारी (BDO) यांची भेट घेऊन तक्रार सादर केली. यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी “योग्य ती कारवाई करून लवकरच तुमच्या मागण्या मान्य केल्या जातील” असे आश्वासन दिले.
संघटनेच्या बैठकीत लाल बावटा बाधकाम कामगार संघटना (CITU) च्या वतीने दाखले देण्याबाबत ठराव मंजूर करण्यात आला. या बैठकीस ता. अध्यक्ष आनंदा कराडे, अध्यक्ष संतोष राठोड, कोषाध्यक्ष रमेश कांबळे, ता. सचिव हारुण माणगावे, ता. उपाध्यक्ष संजय इंगलजकर (शाखा वाडीपीर) तसेच जमीर माणगावे, अकुंश खोत, शिवाजी शेळके, अमिर माणगावे, सुरेश लाड, सुनिल धोत्रे, विजय सवाशे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

बैठकीच्या उपसंहारात ठरविण्यात आले की, अधिकाऱ्यांकडून आश्वासन मिळाल्यानंतरही जर ग्रामसेवक संदीप पाटील यांनी मागण्या पूर्ण केल्या नाहीत, तर लाल बावटा कामगार संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्य ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करतील.

Chief Editor

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.