आरोग्य व शिक्षणसामाजिक

नाते कलेचे माझ्या रक्ताशी !!अष्टपैलू लोक कलावंत चंद्रकांत विरळीकर उर्फ अशोकराव धर्माजी सकट !!

खरंच परमेश्वराने काही व्यक्तींना बऱ्याच काही कला अवगत करून दिल्या आहेत. त्यापैकीच एक अष्टपैलू कलावंत म्हणजे चंद्रकांत विरळीकर उर्फ अशोक राव धर्माजी सकट मु.पो.विरळी ता.माण जि.सातारा होय!!

त्यांच्या आईचे नाव शांताबाई असून ,त्यांना एक मुलगा व चार मुली आहेत. विरळीकर हे गणगवळण ,सरदार, ढोलकीपटू ,पॅड वाजवणे ,सामाजिक ,पौराणिक, कौटुंबिक, ऐतिहासिक ,वगनाट्यात हिरो, व्हिलन,दुखी काम करणे, इत्यादी भूमिकेत तरबेज आहेत.
त्यांना वयाच्या आठव्या वर्षापासूनच कलेचा छंद लागला .लहानपणी वडिलांचा तमाशा असल्यामुळे त्यांना पोलिसांची भूमिका देऊन तरबेज केले आणि नंतर शरद मुसळे पुणेकर आणि निवृत्तीबुवा कुरणकर हे अशोकरावांचे गुरु ठरले.

अशोक रावांनी कै.दत्तोबा तांबे शिरोलीकर,कै.दत्ता महाडिक पुणेकर ,खानदेश रत्न भिका भीमा सांगवीकर ,आनंद महाजन जळगावकर आणि चंद्रकांत सूर्यकांत विरळीकर इत्यादी तमाशा मध्ये अतिशय मोलाची कामगिरी करून महाराष्ट्र मध्ये आपले नाव झळकवले . एकेकाळीचं दत्तोबा तांबे शिरोलीकर या तमाशामध्ये भरला भक्तांचा बाजार अर्थात कथा घडली मंदिरात या वगनाट्यात कैलासराव तांबे यांनी पुजाऱ्याची भूमिका करून आणि अशोक रावांनी डाकूची भूमिका करून रसिकांच्या डोळ्यांचे पारणेच फेडले होते.

2008 रोजी तमाशा विभक्त झाल्यानंतर कलाभूषण प्रतिभारत्न पुरस्कार आणि नागपूर येथील कलारंजन पुरस्कार हेही पटकावले.विरळीकरांनी काही स्वतःची वगनाट्य लिहिली. त्यापैकी कुंकू पुस्ते आनंदाने, पाच सुनांचा पुण्यवंत, वेड्या बहिणीची वेडी माया, विठ्ठल आहे भूवरी ,कुंकू माझं भाग्याचं अर्थात कारगिल युद्ध इत्यादी वगनाट्यात काम करून, समाज प्रबोधन केले.त्याचप्रमाणे माहेरची पाहुणी, कुंकू लावून जा, आणि एक डाव सत्तेचा इत्यादी पिक्चर मध्ये काम करून महाराष्ट्र मध्ये आपले नाव उंच केले.अशोकरावांची राहणी साधी असून,उंच विचार आहेत त्यांची बोलण्याची ढब,शब्द फेक, अभिनय हा काही वेगळा असून रसिकांच्या अंगावर शहारे उभे करणारे आणि रसिकांच्या मनात घर करणारे, असे हेअष्टपैलू कलावंत आहेत.

पुढे विरळीकर म्हणाले की ,पूर्वीच्या तमाशा मधे कलाकारांना इज्जत मिळत होती.फड मालक कलावंतावर प्रेम करीत होते.अलीकडे खरी कला बघणारे रसिक संपले आहेत. हे अगदी नक्की….. आत्ताची तरुण पिढी फक्त गाणी मागतात आणि धिंगाणा करतात.जे खास रसिक श्रुते आहेत, त्यांना तमाशाचा जुना बाज बघण्यास मिळत नाही आणि कलाकारांनाही आपली कला न दाखवता, राउटीमध्ये बसून राहावे लागते ही त्यांनी मोठी खंत व्यक्त केली.

आपल्या अभिनयाच्या जोरावर, प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा कलावंत, सध्या रावटीत झोपतो.पूर्वीचा तमाशा सहा ते सात तास चालत होता .
आत्ताचा तमाशा फक्त दोन ते अडीच तास चालतो. असे असल्यास रसिकांच्या पदरात पूर्ण तमाशा पडत नाही. म्हणून फड मालकाने जुन्या तमाशाचा बाज सादर करणे ही काळाची गरज आहे. तमाशा मधून व्यसनमुक्ती,स्त्रीभ्रूणहत्या,हुंडाबंदी दारूबंदी हे समाज प्रबोधन झाले पाहिजे असे ते म्हणाले.

सिनेमाच्या पडद्यावर दिसणाऱ्या कलाकारापेक्षा ,स्टेजवर काम करणारा,जिवंत कला दाखवणारा ,कलावंत श्रेष्ठ असतो हे अगदी नक्की !! सध्या तरुण पिढी वगनाट्य कडे तोंड मोडत असली तरी, माझ्या वगनाट्याला भरपूर मागणी आहे. हे अगदी खरं सूर्यप्रकाशाएवढे सत्य आहे.कारण वाई ,खंडाळा तालुका भोर, बीड,इंदापूर ,कोरेगाव, माळशिरस ,दौंड, श्रीगोंदा इत्यादी ठिकाणी माजी वगनाट्य होतात. असे ते म्हणाले.

ज्यावेळी लेक वाचवा हा कार्यक्रम साताऱ्यामध्ये झाला त्यावेळेस माझा पहिला क्रमांक आला आणि नागपूरला विमानाने जाऊन कलारंजन हा पुरस्कार मिळाला .हे मी माझं भाग्य समजतो.

माझ्या जीवनातील एक आठवण !!
मी वगनाट्य मध्ये दुखी भूमिका,करीत असताना ,अचानक एक माणूस रडून, रडून बेशुद्ध पडला. त्याला दवाखान्यात नेले असता ,डॉक्टरांनी सांगितले की ,याला फिट आले नाही. दुसऱ्याचे दुःख पाहून हे घडले आहे .
ही त्यांच्या कामाची खरी पावती ठरली.त्यांचे वय आज 62 वर्षाचे असून, ते गेली 54 वर्षे रसिकांची सेवा करीत आहेत. त्यांचा पूर्वींचा तमाशा 2008 मध्ये विभक्त झाला आणि आता स्वतः चंद्रकांत विरळीकर उर्फ अशोकराव विरळीकर लोकनाट्य तमाशा मंडळ या नावाने चालू आहे.
खरंच …..अशा महान कलावंतांना उदंड आयुष्य लाभो, त्यांच्या हातून रसिकांची सेवा घडो ,त्यांचे नाव महाराष्ट्रात झळकत राहो.
अशी माते जगदंबेच्या चरणी प्रार्थना!!
लेखक – शाहीर खंदारे
ता.नेवासा.
8605558432

Chief Editor

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.