परतीच्या पावसाने शिरदाळे (ता.आंबेगाव) परिसरात ज्वारी पिकाला जीवदान !!


पंचनामा लोणी (धामणी) – प्रतिनिधी यंदा पावसाचे प्रमाण अधिकचे पाहायला मिळाले.खरीप हंगाम तसा जास्त पावसामुळे शेतकरी वर्गाला डोळ्यात पाणी आणणारा ठरला.परंतु कोरडवाहू क्षेत्र असलेल्या शिरदाळे परिसरात गेली काही दिवसांपासून परतीच्या पावसाने चांगली हजेरी लावल्याने रग्बी हंगाम जोमात आहे.ज्वारी पिकाला याचा भरपूर फायदा झाला असून त्यामुळे भविष्यात जनावरांना कडबा तसेच ज्वारीचे धान्य होण्यास मदत होणार आहे.आगात (अगोदर) पेरणी झालेली ज्वारी पीक आता कमरेच्या उंचीचे झाले आहे.तसेच बटाटा,सोयाबीन ही पिके निघाल्यानंतर झालेली ज्वारीची पेरणी आणि त्यासाठी झालेला हा पाऊस खूप पूरक असून त्यामुळे शेतकरी समाधानी आहे.नाही खरीप तर रग्बी हंगाम तरी हातात येईल या आशेवर शेतकरी आहे.ज्वारी बरोबर हरभरा पिकाला देखील याचा चांगला फायदा होणार असल्याचे प्रगतशील शेतकरी बाबाजी चौधरी,कांताराम तांबे,केरभाऊ तांबे,राघू रणपिसे,संभाजी सरडे,नानाभाऊ रणपिसे,सुरेश तांबे,कचर तांबे यांनी सांगितले.
हा परतीचा पाऊस रग्बी हंगामाला जीवदान देणारा पाऊस आहे.पाऊस झाला नसता तर ज्वारी पीक येणे शक्य नव्हते त्यामुळे कमीत कमी ज्वारीचे पीक आल्याने उन्हाळ्यातील चाऱ्याचा आणि धान्याचा प्रश्न मिटण्याची शक्यता आहे.भविष्यात अजून एखादा पाऊस झाला तर ज्वारीचे पीक नक्की येईल असे शिरदाळे मा.उपसरपंच मयुर सरडे यांनी सांगितले.







