समर्थ शैक्षणिक संकलात माजी शिक्षक कृतज्ञता सोहळा उत्साहात संपन्न !!


पंचनामा बेल्हे प्रतिनिधी – समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे येथे नुकताच “माजी शिक्षक कृतज्ञता सोहळा” मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
आपल्या सेवाकाळामध्ये शिक्षकांनी सुसंस्कृत पिढी निर्माण करण्याचं काम केलं अशा शिक्षकांप्रती आदरभाव व्यक्त करण्यासाठी सेवानिवृत्त शिक्षकांचा सन्मान सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाचे उद्घाटन दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने करण्यात आले. प्रास्ताविकामध्ये माजी शिक्षकांप्रती कृतज्ञता भाव व्यक्त करताना संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके सर म्हणाले,शिक्षक म्हणजे समाज घडविणारा महत्त्वाचा घटक आहे.शिक्षण क्षेत्रात कार्य करताना शिक्षक विद्यार्थ्यांना ज्ञान,संस्कार आणि मूल्यांचा वारसा देतात.तसेच,सेवेत असताना जसे शिक्षक समाजासाठी कार्य करतात तसेच सेवानिवृत्तीनंतरही आपले आरोग्य,मानसिक संतुलन आणि सक्रिय जीवनशैली टिकविणे गरजेचे आहे.आरोग्य चांगले ठेवले तर आपण समाजासाठी आणि पुढील पिढीसाठी मार्गदर्शक म्हणून कार्य करत राहू शकतो.या प्रसंगी माजी शिक्षकांचा शाल,श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी मार्गदर्शन करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बहि:शाल विभागाचे व्याख्याते व जुन्नर येथील प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकार डॉ.दिलीपजी कचरे उपस्थित होते. सेवानिवृत्तीनंतर आपले आरोग्य उत्तम आणि सुदृढ राहण्यासाठी नियमितपणे व्यायाम, संतुलित आहार,पुरेसे पाणी,झोप आणि मेडिटेशन या पाच घटकांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी उपस्थितांना वेगवेगळ्या व्यायाम प्रकाराचे प्रात्यक्षिकही करून दाखविले.
माजी शिक्षकांनी देखील यावेळी आपल्या मनोगतातून त्यांच्या प्रति आदरयुक्त भावनेने संपन्न झालेल्या या कृतज्ञता सोहळ्याचे धन्यवाद व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके,समर्थ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटचे प्राचार्य डॉ.नवनाथ नरवडे,समर्थ कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.उत्तम शेलार,डॉ.लक्ष्मण घोलप,क्रीडा संचालक हरिश्चंद्र नरसुडे,राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.भूषण दिघे प्रा.गणेश बोरचटे,प्रा.दिनेश जाधव उपस्थित होते.
त्याचप्रमाणे काशिनाथ लामखडे, शंकर गोफने,गंगाराम वाळुंज,देवराम साळवे,अनंत आहेर, कुशाबा हांडे, हरी आहेर, हनुमंत दाते, सुनील सासवडे,अशोक विश्वासराव, मुरलीधर आहेर, मंदाकिनी घंगाळे, बबनराव घंगाळे, पांडुरंग औटी, बाबासाहेब पवार,दत्तात्रय गवळी,बबन पिंगट,विठ्ठल कोकणे,रामभाऊ सातपुते गुरुजी व परिसरातील सेवानिवृत्त शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके, सचिव विवेक शेळके यांनी सर्व माजी शिक्षकांना उत्तम आरोग्याच्या शुभेच्छा दिल्या.प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले,तर डॉ.शरद पारखे यांनी सर्वांचे आभार मानले.




