आरोग्य व शिक्षणसामाजिक

ए.आर.टी.कर्मचाऱ्यांनी केली एका जखमी घुबडाची सुटका !!

पंचनामा पारगाव (शिंगवे) प्रतिनिधी – समीर गोरडे

ऑफिसमध्ये घडलेली एक घटना मनाला चटका लावून गेली, पण शेवटी दिलासा देऊन गेली.आमच्या सहकाऱ्यांनी — प्रकाश, अभय आणि युवा नेतृत्व असलेले अनिकेत — यांनी खूप संवेदनशील आणि धाडसी कामगिरी केली.

एक जखमी घुबड बहुधा घरट्याच्या डोलीतून खाली पडले असावे. त्याच्या आवाजाने त्यांचं लक्ष गेले. त्यांनी कोणतीही भीती न बाळगता त्या पक्ष्याकडे जाऊन पाहिले आणि अत्यंत काळजीपूर्वक त्याला हाताळले.

प्रकाश यांनी ताबडतोब बावधन येथील RESQ Charitable Trust ला संपर्क केला.RESQ Charitable Trust ही संस्था गेली अनेक वर्षे जखमी, हरवलेले किंवा त्रस्त प्राणी आणि पक्ष्यांना वाचवण्यासाठी कार्यरत आहे. त्यांच्याकडे प्रशिक्षित बचावकर्ता, पशुवैद्य आणि पुनर्वसन केंद्र आहे.ते नागरिकांच्या कॉलवर तत्काळ प्रतिसाद देतात, प्राण्याला योग्य उपचार देतात आणि तो पुन्हा सुरक्षितपणे जंगलात किंवा नैसर्गिक ठिकाणी परत जाईल याची काळजी घेतात.

प्रकाश यांच्या कॉल ला त्यांनी लगेच प्रतिसाद दिला त्यांची टीम अतिशय तत्परतेने काही मिनिटांत घटनास्थळी आली. घुबड त्यांच्याकडे सुपूर्द करण्यापूर्वी सर्व आवश्यक कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.एक जीव वाचवण्यात सहभाग घेण्याचं, आणि तो पुन्हा आपल्या नैसर्गिक अधिवासात परत जाईल हे पाहण्याचं समाधान सगळ्यांच्या चेहऱ्यावर उमटलं होतं.

घुबड हा निसर्गातील अतिशय उपयुक्त पक्षी आहे. तो उंदीर, साप आणि इतर किडे खाऊन शेतीचे मोठे नुकसान टाळतो. पण दुर्दैवाने आपल्या समाजात घुबडाविषयी अनेक अंधश्रद्धा पसरलेल्या आहेत —
कोणाला वाटतं घुबड दिसलं म्हणजे अपशकुन, तर काही ठिकाणी त्याला “मंत्रतंत्रासाठी” वापरतात. या चुकीच्या समजुतींमुळे हा सुंदर पक्षी अनेकदा त्रासाला आणि मृत्यूला सामोरा जातो.
खरं म्हणजे घुबड हा निसर्गाचा संतुलन राखणारा प्रहरी आहे. तो नशिबाचा नाही तर निसर्गाचा मित्र आहे.प्रकाश, अभय आणि अनिकेत यांनी “एक घुबड वाचवलं” त्यांच्या या कामगिरीत फारस काही करता आलं नाही यांची खंत आहे…

प्रकाश गुरधाळकर
(Ycm hospital)

Chief Editor

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.