आरोग्य व शिक्षणक्रीडा व मनोरंजन

नाते कलेचे माझ्या रक्ताशी ; अष्टपैलू कलावंत उषाताई दिघे तळेगावकर !!

पंचनामा विशेष – नाते कलेचे माझ्या रक्ताशी !! या लेखमालेचे आकर्षण म्हणजे,ताल,स्वर,लय यांनी परिपक्व असलेल्या,आवाजाची जादू असलेल्या,महान गायिका उषाताई दिघे तळेगावकर !!
ता. संगमनेर,जि.अहिल्यानगर…

त्यांना तीन मुलं ,आणि एक मुलगी आहे.वयाच्या 12 व्या वर्षापासून उषाताईंच्या अंगात कला अवगत झाली.त्यांचे गुरु यासीन भाई शेख होय.परमेश्वराने प्रत्येक कलावंतांना ,कलेचा प्रकार अवगत केलेला आहे.त्याचप्रमाणे उषाताई यांच्या वाट्याला आवाजाची जादू ,बहाल केलेली आहे. कारण उषाताईंचा पहाडी आवाज, गायनाची ढब ही काही वेगळी असून रसिकांच्या मनावर ठसा उमटनारी आहे.

उषाताई म्हणतात की ,पुरस्कार तर नाहीच पण रसिकांनी दिलेली मला शाबासकी, हीच माझ्या कलेची पावती आहे .उषाताईंनी दत्ता महाडिक पुणेकर ,मंगलाताई बनसोडे करवडीकर, काळू बाळू कवलापूरकर ,भिका भीमा सांगवीकर, संध्या माने त्याचप्रमाणे राष्ट्रपती सुवर्णपदक विजेत्या विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर इत्यादी तमाशात काम करून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपले नाव पेरले आहे. त्याचप्रमाणे त्यांनी बाजार भरला भक्तांचा ,सहावाडी बारा भानगडी ,पुन्हा जन्माची कहाणी इत्यादी जुन्या वगनाट्यात काम करून रसिकांची मने जिंकली आहेत.

त्यांची राहणीमान साधी असून ,कलाकारावरती प्रेम ,रसिकांची आवड, फडमालकाशी एकनिष्ठता, प्रेमाची वागणूक, तन-मन-धन एकीकरून काम करण्याची वृत्ती इत्यादी गुण त्यांच्या अंगी आहेत. त्यांचा पहाडी आवाज ऐकून रसिक चकित होतात.उषाताई पुढे म्हणाले की ,पूर्वीचा तमाशा आणि आत्ताचा आधुनिक तमाशा यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे .रसिक कलेचे चाहते राहिले नाहीत ….
पहिल्यासारखा तालासुरात तमाशाचा भाग कमी होत आहे.पहिले पारंपारिक वाद्यात हल्लीचा कॅबरा आणि डिस्को घुसल्यामुळे सर्वच गोंधळ उडाला आहे…….

पूर्वीचा तमाशा पारंपारिक होता,रसिकांना आवडत होता,रसिक जाणकार असून,सध्या त्यांनी या तमाशाकडे हल्लीचा डान्स आणि फक्त गाणी पाहून,पाठ फिरवली आहे. पूर्वीच्या लावण्या ढोलकी ,हलकी, तुंतून ,आणि पायपेटी यावर चालत होत्या.आता रिमिक्स वाद्य असल्यामुळे ,त्यांचे बोल रसिकांच्या कानावर योग्य पडत नाही. हा मोठा फरक तमाशात जाणवतो, हे अगदी खरं ……

पूर्वीच्या तमाशात नाचणाऱ्या नृत्यांगना किंवा हिंदी मराठी गाणाऱ्या मुली,अंग भरून कपडे वापरत होत्या आणि सध्याच्या मुली पूर्वीचा पेहराव न करता हापच कपड्यावर नाचतात.जो पूर्वीच्या तमाशा चा बाज होता तो राहिला नसून रंगाचा बे ढंग झाला आहे.आता फक्त रसिक गाण्यांचा चाहता झाला आहे. प्रत्येक गावामध्ये सर्व गावकऱ्यांनी, एक विचार करून, या गाण्यावर तोडगा काढून ,संपूर्ण तमाशा बाज, म्हणजे गणगवळण, रंगबाजी ,फारसा, सवाल-जबाब .आणि वगनाट्य दाखवले तर ,समाजामध्ये परिवर्तन होऊन ,तमाशाच्या वगनाट्यातून रसिकांना चांगले विचार घेता येतील .समाज प्रबोधन होईल, एक मोठी जाणीव यातून निर्माण होईल .हे अगदी नक्की…..असे त्या म्हणाल्या ..सध्याचे रसिक फक्त गाणी मागतात. बाकीचा तमाशाचा बाज होत नाही.कलाकारांची काम करण्याची इच्छा पूर्ण होत नाही. कलाकारांना पडद्याच्या आड, रावटीमध्ये बसून राहावे लागते. ही मोठी खंत त्यांनी व्यक्त केली…….म्हणून यावर फडमालकांनी आणि रसिक मायबापांनी ,गावकऱ्यांनी विचार करून ,तमाशाचा बाज पूर्वीचा झाला पाहिजे. हा विचार केला तर, पुन्हा तमाशाला चांगले दिवस येतील. अशी त्यांनी अशा व्यक्त केली ……

उषाताई या रसिकांची 44 वर्षे सेवा करीत आहेत. त्यांचे वय आज 56 वर्षाचे आहे.उषाताई या सध्या रेखा सविता नगरकर या तमाशा मंडळात कार्यरत आहेत. खरंच त्यांनी आपले विचार अतिशय स्पष्ट आणि चांगल्या भाषेत मांडले याबद्दल त्यांना धन्यवाद …..
अशीच त्यांच्याकडून रसिकांची सेवा घडो ,त्यांना उदंड आयुष्य लाभो .महाराष्ट्रात त्यांचे नाव झळकत राहो. हीच ईश्वराचरणी प्रार्थना……..

लेखक – शाहीर खंदारे
ता.नेवासा.
86055 58432

Chief Editor

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.