आरोग्य व शिक्षणक्रीडा व मनोरंजन

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निमणबेट (पारगाव) येथे संपन्न झाला पालक मेळावा!!

पंचनामा पारगाव (शिंगवे) प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निमणबेट केंद्र–पारगाव या शाळेत पालक मेळावा उत्साहात पार पडला.

मेळाव्याचे अध्यक्षस्थान पारगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच नितीन ढोबळे यांनी भूषविले.याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे मा.अध्यक्ष श्री. गणेश ढोबळे, ग्रामपंचायत सदस्य सौ. लताताई ढोबळे व वीरेंद्र ढोबळे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.अशोक कांताराम ढोबळे,उपाध्यक्ष सौ.स्वाती विलास भूमकर, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य श्री.संतोष बढेकर, श्री.किशोर ढोबळे, श्री.नथू ढोबळे, श्री.संतोष ढोबळे, सौ. शिल्पा पुंडे, सौ. सुनीता ढोबळे, सौ.अंकिता ढोबळे व पालक बहुसंख्येने उपस्थित होते.

पालक मेळाव्यामध्ये निपुण पुणे, निपुण महाराष्ट्र, निपुण भारत या अभियानाबाबत माहिती देण्यात आली. शाळेचा सदर उपक्रमाबाबत आढावा घेण्यात आला. एक पेड माँ के नाम!! अभियानामध्ये शंभर टक्के पालकांनी सहभाग घेतल्यामुळे पालकांचे अभिनंदनचा ठराव घेण्यात आला. शाळेतील ज्या विद्यार्थ्यांनी व पालकांनी अध्ययन कोपरे केले आहे त्यांचा उल्लेख करून, उत्कृष्ट अध्ययन कोपरे निर्माण केलेल्या पालक व पाल्याचा सन्मान करून प्रोत्साहन देण्यात आले.

कार्यक्रमांमध्ये वाचन प्रेरणा दिन याविषयी माहिती देऊन उपक्रम साजरा करण्यात आला. स्वच्छ हात धुवा दिन या उपक्रमाबाबत मार्गदर्शन करण्यात आले व प्रात्यक्षिकही घेण्यात आले.

पारगाव केंद्राचे केंद्रप्रमुख श्री.मच्छिंद्र काळे यांनी विद्यार्थी व पालक यांचे नाते कसे असावे? विद्यार्थ्याच्या प्रगतीमध्ये पालकाची एक सुज्ञ पालक म्हणून भूमिका, त्याचप्रमाणे पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.गजानन पाटील यांनी सुरू केलेले अध्ययन कोपरा, निपुण पुणे या उपक्रमांची माहिती दिली.

पालक मेळाव्याचे शेवटी मुख्याध्यापक श्री.रामदास उंडे यांनी माजी विद्यार्थी संघाची रचना व कार्यवाही याबाबत माहिती दिली. माजी विद्यार्थी संघ सर्व पालकांच्या उपस्थितीत स्थापन करण्यात आला. शेवटी सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची सांगता झाली. प्रसंगी पालकांची उपस्थिती उत्स्फूर्त होती.

Chief Editor

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.