शिंदेवाडी-एकलहरे (ता.आंबेगाव) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भारतरत्न,मा.राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस ‘वृत्तपत्र विक्रेता दिन’ व ‘वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा !!


पंचनामा कळंब प्रतिनिधी – शिंदेवाडी-एकलहरे (ता.आंबेगाव) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भारतरत्न,मा.राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस ‘वृत्तपत्र विक्रेता दिन’ व ‘वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात आला.

यावेळी शाळेत ग्रंथपूजन,प्रतिमापूजन,पुस्तक प्रदर्शन,चित्रफिल्म पाहणे,वाचनध्यास आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.






सुरुवातीला शाळेत ग्रंथपूजन व डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी अखिल भारतीय सानेगुरुजी कथामाला पुणे जिल्हा समिती ग्रामीणचे अध्यक्ष बाळासाहेब कानडे गुरुजी,मुख्याध्यापक दता गोरडे,शिक्षक संतोष थोरात,अंगणवाडी सेविका जयश्री आग्रे,मदतनीस कमल भोर,शाळकरी विद्यार्थी व अंगणवाडी बालचमू उपस्थित होते.

मुख्याध्यापक दता गोरडे यांनी डॉ.अब्दुल कलाम यांच्या स्वावलंबी शिक्षणाचे महत्त्व व जागतिक हात धुवा दिनाविषयी माहिती विद्यार्थ्यांना सांगितली.यावेळी शिक्षक संतोष थोरात यांनी वृतपत्र वाचन काळाची गरज याविषयी आपले मनोगत व्यक्त केले.
विविध पुस्तके विद्यार्थ्यांना स्वहस्ते,मुक्तपणे हाताळता व वाचता यावा या उद्देशाने शाळेत पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.यानिमित्त शाळेत ‘वाचनध्यास’ उपक्रम राबविण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक संतोष थोरात व आभार मुख्याध्यापक दता गोरडे यांनी मानले.



