आरोग्य व शिक्षणसामाजिक

जवळे (ता.आंबेगाव) ग्रामपंचायतने घरपट्टी वसुलीसाठी राबवला अनोखा उपक्रम!!

पंचनामा पारगाव (शिंगवे) प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यातील सर्वार्थाने प्रगतशील गाव म्हणून ओळख असणाऱ्या जवळे गावाचे घरपट्टी वसुलीसाठी अनोखा उपक्रम राबवला आहे.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या अनुषंगाने ग्रामपंचायत जवळेच्या माध्यमातून 1 एप्रिल 2025- 2026 पासून या आर्थिक वर्षात ज्यांनी घरपट्टी भरून ग्रामपंचायतला सहकार्य केले आहे त्या खातेदारांना आजपासून प्रत्येकी १ कलम केलेल्या केशर आंबा ४- ५ फुटी रोपाचे वाटप करणेत येणार आहे.तसेच जे खातेदार ३० ऑक्टोबर पर्यंत आपली चालू /थकीत घरपट्टी भरून ग्रामपंचायतला सहकार्य करतील त्या सर्व खातेधारकांना कलम केलेल्या केशर आंब्याच्या रोपाचे वाटप खातेदार निहाय – १ करणेत येईल.तरी लवकरात लवकर घरपट्टी भरून ग्रामपंचायत ला सहकार्य करावे असे आवाहन गावच्या आदर्श सरपंच वृषालीताई उत्तम शिंदे पाटील यांनी केले आहे.

खातेधारकांना रोपे वाटण्याच्या कार्यक्रम वेळी उपसरपंच मनीषा टाव्हरे, शीला साबळे ग्रामपंचायत अधिकारी,दत्तात्रय लायगुडे हरिभाऊ अभंग अरुण वाळुंज अशोक शिंदे नवनाथ शिरतार अशोक लोखंडे उपस्थित होते घरपट्टी घरा व केशर आंब्याचे झाड मोफत मिळवा हा नाविन्यपूर्ण उपक्रम ग्रामपंचायत जवळे राबवत आहे तरी सर्वांनी घरपट्टीवरून ग्रामपंचायतला सहकार्य करावे असे आवाहन सरपंच सौ
वृषालीताई उत्तम शिंदे पाटील यांनी केले आहे.

Chief Editor

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.