आंबेगाव तालुक्यातील लोणी (धामणी) येथे वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा !!


पंचनामा लोणी (धामणी) प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यातील लोणी (धामणी) येथे विकास वाचनालय लोणी यांच्या माध्यमातून श्री.भैरवनाथ विद्याधाम प्रशाला व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोणी यांच्या सहकार्याने भारतरत्न स्व.डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती दिन १५ ऑक्टोबर निमित्य दि.१५/१०/२०२५ रोजी मोठ्या उत्साहात वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला.
सदर दिनानिमित्य सकाळी ११.०० वा. ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर सकाळी ११.३० वा विद्यार्थ्यासाठी वाचनकट्ट्याचे आयोजन करण्यात आले. त्यानंतर दुपारी १२.३० वा विकास वाचनालयातर्फे श्री. भैरवनाथ विद्याधाम प्रशाला व जिल्हा परिपद प्राथमिक शाळा यांना स्कॉलरशिप, जनरल नॉलेज, स्पर्धा परिक्षा, बालसाहित्य अशा प्रकारची पुस्तके भेट देण्यात आले.
श्री. भैरवनाथ विद्याधाम प्रशाला, लोणी येथे कार्यक्रम आयोजित करून सभेच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे संचालक श्री. अक्षय उमेश सुतार हे होते. वाचनाची प्रेरणा हिच खरी ज्ञानार्जनाची सुरूवात असते. सर्वांनी अवांतर वाचन केले पाहिजे असे सांगितले. वाचनाने माणूस ज्ञानी होतो तसा तो कोणत्याही क्षेत्रात धैर्याने उभा राहतो. तेव्हा ग्रंथ हेच गुरू! आणि ग्रंथ हेच कल्पतरू आहेत. म्हणून ग्रंथांचे वाचन अनिवार्य आहे असे सांगितले.

तसेच सदर कार्यक्रमास वाचनालयाचे संस्थापक कार्यवाह ग्रंथमित्र श्री. धो.स. सुतार गुरूजी, माजी विद्यार्थी विकास प्रबोधिनीचे पदाधिकारी व शालेय व्यवस्थापन चे सौ. गिता लंके, श्री. प्रकाश सिनलकर, श्री. राहुल डोके, मुख्याध्यापक श्री. रविंद्र ढगे सर, श्री. संदिप क्षिरसागर सर, श्री. साजिद तांबोळी सर, श्री. निखिल शिंदे सर, श्री. उमेश अडसुळ सर, श्री. शुभम खुपटे सर, श्री. गोरख कवटाळे सर, श्री. प्रकाश चौधरी सर, सौ. जयश्री कोकाटे मॅडम, तसेच जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्री. मुबीन मुंढे सर, श्री. शंकर कदम सर, श्री. सुभाप चौधरी सर, सौ. राजश्री मोटे मॅडम हे उपस्थित होते.

सभेच्या समारोप करताना श्री. प्रकाश सिनलकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. त्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.



