आरोग्य व शिक्षणक्रीडा व मनोरंजनसामाजिक

समर्थ संकुलात “शून्य कचरा व्यवस्थापन” कार्यशाळेचे आयोजन!!

समर्थ संकुलात “शून्य कचरा व्यवस्थापन” कार्यशाळेचे आयोजन!!

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे विद्यार्थी कल्याण मंडळ व समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स बेल्हे,यांच्या संयुक्त विद्यमाने “शून्य कचरा व्यवस्थापन” या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन नुकतेच समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे येथे करण्यात आले होते.या कार्यशाळेसाठी रिसर्च,इनोवेशन व इंटरनॅशनलायझेशन सेलचे प्रमुख डॉ.प्रतिक मुणगेकर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.

शून्य कचरा व्यवस्थापन या विषयावर बोलताना डॉ.प्रतिक मुणगेकर म्हणाले की,शून्य व्यवस्थापन ही काळाची गरज असून तरुणांनी त्यासाठी पुढाकार घ्यावा.हवामान बदल आणि पर्यावरणीय ऱ्हासाच्या आव्हानांसह,शून्य कचरा तत्त्वे स्वीकारणे केवळ फायदेशीरच नाही तर अत्यावश्यक आहे.सेंद्रिय कचऱ्याचे कंपोस्टिंग केले पाहिजे जेणेकरून मातीमध्ये पोषक तत्वे परत येतील,रासायनिक खतांची गरज कमी होईल आणि कचराकुंड्यांमधून मिथेन उत्सर्जन कमी होईल.एकदा वापरता येणाऱ्या प्लास्टिकच्या वापरावर निर्बंध घालणे.यामुळे कचरामुक्त संस्कृती निर्माण होऊ शकते.शून्य कचरा व्यवस्थापन तंत्रज्ञानामध्ये स्मार्ट कचराकुंड्याचा वापर करायला हवा.साहित्याचा पुनर्वापर करून आणि कंपोस्टिंग करून समुदाय त्यांचे पर्यावरणीय प्रभाव लक्षणीयरीत्या कमी करू शकतात.आपले घर,शाळा,सरकारी कार्यालय,महाविद्यालय,दवाखाने यातून बाहेर पडणारा कचरा खूप मोठ्या प्रमाणात आहे.शून्य कचरा व्यवस्थापनानुसार नियोजन केल्यास कचरा नियंत्रित राहील.कचऱ्याचे व्यवस्थापन करत असताना ओला कचरा,सुका कचरा,इलेक्ट्रॉनिक कचरा अशा अनेक माध्यमातून त्या कचऱ्याचे व्यवस्थापन करणे हे आजच्या युवकांपुढील आव्हान आहे.आपले घर ते आपला देश कचरामुक्त असावा असा सर्वांनी दृढ निश्चय मनामध्ये करावा.शून्य कचरा व्यवस्थापन हा प्रकल्प सक्षमतेने राबविल्यास विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती निर्माण होईल.सुरुवात स्वतःच्या घरापासून तर महाविद्यालयापर्यंत तसेच ज्या गावात आपण राहतो त्या ठिकाणी विद्यार्थी स्वतः पुढाकार घेऊन काम करतील.यामुळे स्वतःचे घर,स्वतःचे महाविद्यालय,स्वतःचा गाव,स्वतःचा तालुका,स्वतःचे राज्य आणि प्रसंगी स्वतःचा देश स्वच्छ आणि सुंदर होण्यास मदत होईल.कचऱ्यामुळे होणाऱ्या दुर्गंधीचा नाश झाल्यामुळे शारीरिक आरोग्य तर चांगले राहीलच परंतु हा उदात्त विचार मनामध्ये ठेवल्यामुळे मानसिक आरोग्य देखील चांगले राहील.शून्य कचरा व्यवस्थापनाशी संबंधित आव्हानांवर मात करणे हे येणाऱ्या पिढ्यांसाठी शाश्वत भविष्य निर्माण करण्यासाठी आवश्यक असेल.स्वच्छतेविषयी तरुणांमध्ये होणारे सकारात्मक बदल हेच शून्य कचरा व्यवस्थापनाचे गमक असल्याचे यावेळी डॉ.प्रतिक मुणगेकर म्हणाले.यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत समर्थ कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स चे प्राचार्य डॉ.उत्तम शेलार,डॉ.लक्ष्मण घोलप,विभागप्रमुख प्रा.निलेश गावडे,प्रा.योगेश राऊत,प्रा.प्रशांत काशीद,राष्ट्रीय सेवा योजना विभागप्रमुख प्रा.दिनेश जाधव,प्रा‌.कल्याणी शेलार,विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा.गणेश बोरचटे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यशाळेचे प्रास्ताविक डॉ.उत्तम शेलार यांनी,सूत्रसंचालन प्रा.गणेश बोरचटे व आभार प्रा.निलेश गावडे यांनी केले.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.