पारगाव (शिंगवे) येथे संत रोहिदास महाराज जयंती उत्साहात साजरी!!

पारगाव (शिंगवे) येथे संत रोहिदास महाराज जयंती उत्साहात साजरी!!
आंबेगाव तालुक्यातील सर्वार्थाने प्रगतशील गाव म्हणून ओळख असणाऱ्या पारगाव (शिंगवे) येथील ग्रामपंचायत कार्यालयात संत रोहिदास महाराज यांची जयंती मोठया उत्साहात संपन्न झाली.
यावेळी संत रोहीदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रतीमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
संत रोहिदास महाराज यांनी केलेल्या कार्याचा व संत विचाराचा समाजावर असणारा प्रभाव व त्यांनी केलेल्या समानता, बंधुता आणि सहनशीलता या विचार सरणीचा समाजावर असणारा यावेळी विशद करण्यात आला.
या प्रसंगी उपसरपंच नितीन ढोबळे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य विठ्ठलराव ढोबळे,ग्रामपंचायत सदस्य काळूराम लोखंडे, बजरंग देवडे ,वीरेंद्र ढोबळे ,प्राध्यापक सोपान शिंदे,रोहिदास लोंढे ,बबन दादा लोंढे, अभिमन्यू लोखंडे, दिनेश लोंढे ,विशाल लोंढे ,शंकर देवडे ,साईनाथ गायकवाड, सोनू गायकवाड ,दिनेश लोंढे, बाबाजी लोंढे, सुधीर ढोबळे, बाबू जाधव व ग्रामस्थ व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.